टीम मंगळवेढा टाईम्स।
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं होतं. पण आम्ही कधीच आंदोलकांना लाठीमार केला नव्हता. सध्याचं सरकार हे निर्घृण सरकार आहे. तुम्ही कुणावर गोळ्या चालवत आहात.
लोकांच्या केसाला धक्का जरी लागला तरी अख्खा महाराष्ट्र इथं आणून उभा करीन”, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ठाकरे यांनी आज जालना येथील अंतरवाली सराटी येथे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
गणेशोत्सवात संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे, त्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, एक फुल दोन हाफ सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार होता. त्याच्यासमोर ही अडगळ नको, म्हणून ते तुम्हाला जबरदस्तीने उठवायला निघाले होते.
शरद पवारांचा आरोप, ‘मुंबईवरून आदेश आल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर‘
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांच्या लाठीचार्जनंतर शरद पवार आणि उदयनराजे घटनास्थळी पोहोचले.
शुक्रवारी रोजी मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केला. यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी दोघेही जखमी झाले आहेत.
सदर घटनेचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.तसंच, राजकीय पक्षांकडूनही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतं.
अंतरवाली सराटी गावात पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी पोलिसांच्या लाठीमाराचा तीव्र शब्दांत निषेध केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज