मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
तू गाडीतून खाली उतर नाहीतर तुला उडवतो अशी धमकी देवून कानाला पिस्तूल लावून तू दुसर्याला काय काय शिकवतो असे म्हणत लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी
बापूसो उर्फ पप्पू काकेकर, संजय विठ्ठल काकेकर, बिंटू काकेकर, बॉबी काकेकर आदी फरार चौघांना पोलीसांनी अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी विजय श्रीमंत भोसले (रा.कागष्ट) हे दि.5 जून रोजी दुपारी 12.30 वा. कागष्ट गावातून घरी जात असताना आरोपीनी महिंद्रा कंपनी एक्स यु व्ही गाडी क्रमांक एम एच 13,डी.एम.0127 ही गाडी थांबवून
खाली उतर असे म्हणू लागले असताना फिर्यादी गाडीतून खाली उतरले नाहीत, त्यामुळे चिडून जावून वरील सर्व आरोपीनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावर फिर्यादीने गाडीची काच थोडी खाली घेतली असता आरोपीने फिर्यादीच्या कानाजवळ पिस्तूल लावली व तु गाडीतून खाली उतर नाहीतर तुला उडवतो अशी धमकी दिल्याने फिर्यादी गाडीतून खाली उतरले असता तु राजू घुले यास काय शिकवतो अशी विचारणा करत जवळ पडलेला दगड घेवून डोक्यात मारला.
तसेच लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर गाडीवर दगड मारून गाडीच्या काचा फोडून नुकसान केल्याचा प्रकार घडला होता.
यात घटनेत बापूसो उर्फ पप्पू काकेकर, संजय विठ्ठल काकेकर, बाळासाहेब जगताप,बिंटू काकेकर, बॉबी काकेकर, वैभव उर्फ गोल्या काकेकर,तेजस काकेकर,विशाल काकेकर (सर्व रा.कागष्ट) असे 8 आरोपी होते. यामधील चार आरोपींना पकडण्यात तपासिक अंमलदार बापूसो पिंगळे यांना यश आले असून
त्यांनी वरील चार आरोपींना अटक करुन न्यायालयात उभे केले असता दि.3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलीस तपासात तेजस काकेकर व विशाल काकेकर हे दोन आरोपी घटनेच्या दिवशी परीक्षेला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे तपासिल अंमलदार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज