मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पतीच्या निधनाला वर्ष दोन वर्षे उलटली… वडील वारल्याने वारसाने आमची नोंद लागली… काहीच कारण नाही तरीही पेंशन जमा होत नाही.
अशा गावोगावच्या सर्वसामान्यांच्या असंख्य तक्रारी वांगी गावच्या नंदकुमार पवार त्याने तर मुख्यमंत्री कक्षाकडेच तक्रार केली. मात्र सव्वा वर्षानंतरही न्याय काही मिळाला नाही.
शेतकऱ्यांना काहीसा आधार व्हावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेत सातबारा नावावर असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षाला ६ हजार रुपये ऑनलाइन जमा होतात. सुरुवातीच्या काळात ज्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला त्यांना पैसे मिळू लागले.
मात्र त्यांना केवायसी करणे बंधनकारक केले. त्या कारणाने अनेकांचे पैसे मिळणे बंद झाले. केवायसी कारणामुळे वर्षभरापासून पैसे जमा होत नसल्याने आता केवायसी करूनही पैसे जमा होत नाहीत. काहींचा कुटुंबकर्ता कोरोना, अपघात व इतर कारणामुळे मयत झाला. त्याचे वारस म्हणून पत्नीचे नाव सातबारावर आले.
काहींचे वडील मयत झाल्याने वारसाने मुलांची नावे सातबारावर आली. हे लोक वर्ष-दोन वर्षांपासून तलाठी, कृषी सहायक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागतात.
मात्र कोणीच दखल घेत नाहीत. काहींचे विनाकारण पैसे जमा होणे थांबले. चौकशी केली तर आधार कार्ड झेरॉक्स घेतले जाते, पुढे काहीच होत नाही.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगीच्या नंदकुमार पवार यांनी पीएम किसान योजनेसाठी एप्रिल २०२२ मध्ये ऑनलाइन अर्ज केला. तहसील कार्यालयाला हेलपाटे मारून काहीच उपयोग झाला नाही.
कारण पैसे काही जमा होत नाहीत. २८ फेब्रुवारीला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाला तक्रार नोंदवली. २४ फेब्रुवारी रोजी पवार यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र पवार यांचे प्रकरण काही मार्गी लागले नाही. (स्रोत:लोकमत)
तहसीलचे वर्षभराने उत्तर ….
पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याची एप्रिल २२ मध्ये दिलेल्या तक्रारीचे मार्च २३ मध्ये उत्तर तहसीलच्या निवासी नायब तहसीलदारांनी उत्तर दिले. ■ मुख्यमंत्री सचिवालय कक्षाला दिलेल्या तक्रारीचे उत्तर १४ दिवसात मिळाले.
पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्राचे उत्तर पाचव्या दिवशी मिळाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज