मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सुजित शिवाजी साळुंखे (वय २५, रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय २६, रा. वडोली, ता.माढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुजीत साळुंखे, शरद माने पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते.
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधील जिल्हा पुर्नवसन अधिकारी कार्यालयातून घेतल्याचे दोघांनी भासविले होते. भरती प्रक्रियेत आरोपी साळुंके, माने यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत उघडकीस आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल – मुख्यमंत्री
पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त केला.
पंचायत समिती पंढरपूरच्या आवारात पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी 2023 समारोप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या 17 वर्षापासून स्वच्छता दिंडी काढण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केल्यामुळे नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत.
स्वच्छतेची लोकचळवळ होणे ही समाधानकारक बाब आहे. पंढरपूर येथे सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन चांगल्यारितीने झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज