mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांची आज पाणी संघर्ष परिषद; प्रा.शिवाजीराव काळुंगे यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 26, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
नागरिकांनो! मंगळवेढयात आज रक्तदान शिबीर व महिलांसाची मोफत हिमोग्लोबिन तपासणी होणार; प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। 

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील विशेषत: आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची 31 वी पाणी संघर्ष परिषद आज दि.26 जून रोजी मंगळवेढ्यात होणार असल्याची माहिती पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी दिली.

या परिषदेमध्ये टेंभू, म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमोडी, नीरा, देवघर इ. योजनांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषिसिंचन विकास योजनेत समावेश करून निधी उपलब्ध करून देणे, टेंभू, म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमोडी, तारळी, ताकारी, धोम बलकवडी,

नीरा, देवधर इत्यादी योजनांचे पाणी समन्यायी वापराच्या तत्त्वावर आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्व, पलूस, खटाव, खंडाळा, माण इत्यादी दुष्काळी तालुक्यांला मिळणे.

वरील योजनांच्या मुख्य कालव्यासाठी व पोट कालव्यांसाठी तसेच दि. 2 मे 2017 रोजी शासनाने जाहीर केलेल्या नवीन धोरणाप्रमाणे मुख्य कालव्यावर ठिकठिकाणी 100 हेक्टरच्या व त्यावरील सिंचनासाठी नवीन जलसाठे, लहान तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे,

सध्या अस्तित्वात असलेले व नवीन साठे निर्माण करून नळाद्वारे त्यामध्ये पाणी साठविण्यासाठी निधीची व्यवस्था करणे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याचे दर छोट्या शेतकऱ्यांना परवडण्या एवढेच ठेवावेत आणि समान पाणी वाटपाची अंमलबजावणीसाठी आग्रह धरणे.

चितळे जलआयोगाच्या शिफारशीनुसार शेतीवर राबून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे 1000 घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्याचे तत्त्व सर्व योजनांना लावून सरकारचे समन्यायी पाणी वाटप प्रत्याक्षात अवलंब करून देशाच्या सरासरी सिंचन टक्केवारी इतकी नेणे., भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यासाठी.

मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी. उजनी उजवा कालवा व जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ 6 व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधीची व्यवस्था करणे. आणि मागण्यावर यावर चर्चा करण्यात येणार असून यामध्ये वैभवकाका नायकवडी,

प्रा. डॉ. बाबुराव गुरव,अॅड. सुभाष पाटील, महादेव देशमुख, आ. राजेंद्रअण्णा देशमुख, प्रा. आर. एस. चोपडे,अॅड. सरफराज बागवान, डॉ. बाबासाहेब देशमुख, अनिल पाटील,प्रा. बाळासाहेब नायकवडी, भाई चंद्रकांत देशमुख,प्रा. दत्ताजीराव जाधव,अॅड. भारत पवार आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

उजनीचे पाणी तालुक्यातील पूर्ण लाभ क्षेत्राला मिळत नाही, मंगळवेढा उपसासिंचन योजनेचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे, म्हैसाळ योजनेचे पाणी देखील पूर्ण क्षेत्राला मिळून लाभक्षेत्रातील तलाव भरून देणेचा प्रश्न मार्गी लावण्याचे दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तालुक्याकडे दुर्लक्ष केले. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी ही पाणी परिषद निर्णायक ठरणार आहे.

पद्मभूषण क्रांतिवीर कै. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी,भाई कै. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे, त्यामध्ये काही अंशी यश आले. अजूनही मंगळवेढ्यातील मुख्य पाणी प्रश्न रखडला आहे. दुसऱ्यांदा मंगळवेढ्यात पाणी परिषद होत आहे, नागरिकांनी उपस्थित रहावे.- शिवाजीराव काळुंगे, अध्यक्ष पाणी परिषद

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पाणी संघर्ष परिषद

संबंधित बातम्या

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 6, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 6, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
Next Post
संस्कृती जपली! आरोप प्रत्यारोप अन् काच फोडूनही विठ्ठलच्या वतीने केला नेत्यांचा सन्मान; अभिजित पाटील यांचा दिलदारपणा

संस्कृती जपली! आरोप प्रत्यारोप अन् काच फोडूनही विठ्ठलच्या वतीने केला नेत्यांचा सन्मान; अभिजित पाटील यांचा दिलदारपणा

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 6, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 6, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 6, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..