mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणी एकाला अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 12, 2023
in क्राईम, राज्य
सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे.

अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं यासंदर्भात कारवाई केली. स्थानिक न्यायालयाकडून 13 जूनपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथकं तयार करण्यात आली होती.

अखेर पवारांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं. दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीनं हे पाऊल का उचललं याचा शोध मात्र सुरू आहेत.

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रीया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावानं एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती.

तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.

दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावानं एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती.

तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. (स्रोत:Abp माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धमकीशरद पवार

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

May 24, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

खळबळ! थेट तहसीलदारांनाच धमकावले; ‘महा-ई-सेवा’ केंद्र चालकाची मुजोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

May 24, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल; रक्ताचं पाणी करून शिकवले, त्याच बापावर आली भीक मागण्याची वेळ; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

May 23, 2026
Next Post
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

मंगळवेढ्याचा नायब तहसिलदार असल्याचे सांगत अमेरिकेतील एकाला ४ कोटींचा गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी

May 26, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले

May 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा