मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
तु गाडीतून खाली उतर नाहीतर तुला उडवतो अशी धमकी देवून तु दुसर्याला काय काय शिकवतो असे म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी
बापूसो उर्फ पप्पू काकेकर, संजय विठ्ठल काकेकर, बाळासाहेब जगताप, बिंटू काकेकर, बॉबी काकेकर, वैभव उर्फ गोल्या काकेकर, तेजस काकेकर, विशाल काकेकर (सर्व रा.कागष्ट) या आठ जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी विजय श्रीमंत भोसले रा.कागष्ट हे दि.5 जून रोजी दुपारी 12.30 वा. कागष्ट गावातून घरी जात असताना
आरोपीनी महिंद्रा कंपनी एक्स यु व्ही गाडी क्रमांक एम एच 13,डी.एम.0127 ही गाडी थांबवून खाली उतर असे म्हणू लागले असताना फिर्यादी गाडीतून खाली उतरले नाहीत, त्यामुळे चिडून जावून वरील सर्व आरोपीनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावर फिर्यादीने गाडीची काच थोडी खाली घेतली असता आरोपीने फिर्यादीच्या कानाजवळ पिस्तूल लावली व तु गाडीतून खाली उतर नाहीतर तुला उडवतो अशी धमकी दिल्याने
फिर्यादी गाडीतून खाली उतरले असता तु राजू घुले यास काय शिकवतो अशी विचारणा करत जवळ पडलेला दगड घेवून डोक्यात मारला.
तसेच लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर गाडीवर दगड मारून गाडीच्या काचा फोडून नुकसान केले.तसेच भांडणात फिर्यादीच्या डाव्या हातीतील अर्धा तोळयाच्या दोन अंगठया पडून गहाळ झाल्या.
आरोपी बॉबी काकेकर यानेफिर्यादीच्या गळयातील एक तोळा वजनाचे सोन्याचे लॉकेट काढून घेतल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
भा.दं.वि.324, 323, 141,147, 148, 149, 504, 506 प्रमाणे वरील आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
लोखंडी गजाने मारून एकाची करंगळी फ्रॅक्चर केल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हे दाखल
तुझा भाऊ कोठे आहे, त्यास आम्ही सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ,दमदाटी करून एकास लोखंडी गजाने मारून करंगळी फ्रॅक्चर केल्याप्रकरणी
अजय श्रीमंत भोसले,श्रीमंत गणपती भोसले, राजाराम निवृत्ती जगताप, राजाराम गणपती भोसले, रणजित राजाराम जगताप, संजय राजाराम भोसले(सर्व रा.कागष्ट) या सहा जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी सुनिल काकेकर (रा.कागष्ट) हे दि.5 रोजी रात्री 9.00 वा. पत्नी व आई वडील घरासमोर असताना आरोपीने येवून तुझा भाऊ बापूसोा काकेकर कोठे आहे, त्यास आम्ही सोडणार नाही,त्याचा जीव मारू असे म्हणत शिवीगाळी करू लागला.
तेव्हा फिर्यादीच्या आई वडीलांनी काय झाले आहे.तुम्ही माझे मुलास कशासाठी शिव्या देता असे विचारले असता आरोपीने माझा भाऊ विजय भोसले यास विनाकारण मारहाण केली आहे.त्यास आम्ही सोडणार नाही असे म्हणाले असता फिर्यादीचे वडील म्हणाले,मारले असेल तर तुम्ही पोलिसांत तक्रार दया,
पोलिस त्यास बघून घेतील असे समजावून सांगत असताना आरोपीने तुम्ही आम्हास सांगू नका,तुम्हाला पण मस्ती आली आहे असे म्हणत आरोपीने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारल्याने करंगळी फ्रॅक्चर झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज