मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांसह गुलबर्गा मंगळवेढा भागात सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक माेठा ट्रकचा टायर फूटल्यासारखा जमिनीतून आवाज आल्याने खळबळ तर उडालीच मात्र परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दक्षिणच्या तहसील प्रशासनाकडून याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणच्या परिसरात 1.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.
हा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तुषार ठोंबरे यांनी केले आहे.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शमा पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव, होटगी स्टेशन, मंदुप, हिपळे, फताटेवाडी, औज आहेरवाडी, तिल्हेहाळ, करणवस व बोरूळ या परिसरामध्ये काल दुपारी 1.20 वाजेच्या दरम्यान सौम्य आवाज ऐकू आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब तहसिलदार दक्षिण सोलापूर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आणून आणून दिली.
सदर बाबीची पडताळणी करिता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, नवी दिल्ली यांच्याकडे शहानिशा केली असता, सोलापूर शहर (वालचंद इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी) परिसरातील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या भूकंप मापक स्टेशनमध्ये 1.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली असल्याचे सांगितले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त स्केलचा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज