मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
कोणतीही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच लेखी कळवूनही लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिचा
सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र भगवान गायकवाड ( महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, प्रजाशक्ती पार्टी, रा. आगळगाव रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे.
पोलिस अमोल वाडकर यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या दरम्यान घडली. गायकवाड याने बार्शी शहर पोलिस ठाण्यास ६ मे रोजी व पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना ९ मे रोजी १२ मे रोजी लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करीत असून, सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळावा, यासाठी अर्ज केला होता.
कार्यक्रमावेळी अनुचित प्रकार घडू नये, महावितरण वीजपुरवठा मंजुरी प्रमाणपत्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास अनुचित प्रकार घडू नये यासाठी वितरणचे कर्मचारी नेमणूक केल्याबाबतचे प्रमाणपत्र,
आपत्कालीन अग्निशामक यंत्रणा प्रमाणपत्र, अॅम्ब्युलन्स व वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध प्रमाणपत्र याची पूर्तता करावी व नंतर पोलिस बंदोबस्त शुल्क भरल्यानंतर कार्यक्रमास परवानगी व सशुल्क बंदोबस्त देण्यात येईल, असे लेखी १२ मे रोजी गायकवाड यास कळवले होते.
तरीही कोणतीही शासकीय परवानगी घेतली नाही व कार्यक्रम आयोजित केला म्हणून गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सचिन कदम तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज