टीम मंगळवेढा टाईम्स।
दहावी बोर्ड परीक्षेकरिता गणित विषयाच्या पेपरला बनावट रिसीट (प्रवेशिका) बनवून खोट्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता बसविण्याच्या प्रयत्नात असलेल्या
एजंट हरिदास गायकवाड आणि बनावट रिसीट बनवणारे गणेश चोपडे यांची मुख्य न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १७ वर्षानंतर हा निकाल लागला.
मार्च २००५ मध्ये दहावी बोर्ड परीक्षाकरिता गणित विषयाच्या पेपरला सोलापूर येथील मॉडर्न हायस्कूलचा विद्यार्थी अरुण म्हेत्रे व विनोद बंडगर यांना मदत करण्याकरिता एजंट मार्फत बनावट विद्यार्थी व परीक्षा रिसीट तयार करून परीक्षा देण्याच्या प्रयत्नात तिघेजण होते.
त्यावेळी २८ मार्च २००५ रोजी साईप्रसाद हॉटेल येथे सापळा रचून सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तिघांना अटक करून त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविला. तपास होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी यांच्यासमोर सुमारे १७ वर्षांनंतर सुरू झाली. या खटल्याचे कामी ७ साक्षीदारांच्या शपथेवर साक्ष सरकार पक्षाने नोंदवल्या होत्या.
परंतु साक्ष जबाब, उलट तपास यामध्ये बऱ्याच तफावती दिसून आल्या. आरोपी विरुद्ध गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपाची मालिका परिपूर्ण असल्याचे सरकार पक्षाला शाबित करता आले नाही.
आरोपीच्या वतीने अॅड. सुरेश गायकवाड यांनी दोषारोप व साक्ष जबाब यातील विसंगती व अपुरेपणा याबाबत अनेक महत्त्वपूर्ण न्याय निवाडे सादर करून सरकार पक्षाचे आरोप खोडून काढले.
त्यावर न्यायालयाने आरोपीच्या वतीने अॅड. सुरेश गायकवाड व अॅड. मंजुश्री देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील जोशी यांनी मांडली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज