टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदी पात्रात चार व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी सिद्धापूर ता मंगळवेढा येथे पोटापाण्यासाठी गोरखा म्हणून आलेल्या एका कुटुंबातील एक मुलगा एक मुलगी व दोन महिला यांचा भीमानदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
गेल्या आठ दिवसा खाली सिधापुर येथे बाहेरून दोन पुरुष दोन महिला व एक लहान मुलगा व एक लहान मुलगी असे एक कुटुंब आले होते.
यातील पुरुषमंडळी रात्रीच्या वेळी ते गोरखा म्हणून काम करत होते आज दुपारी एकच्या सुमारास दोन महिला व त्यांची दोन मुले येथील शाळेच्या पाठीमागे कपडे धुण्यासाठी भीमा नदीत गेल्या होत्या
त्या महिलांचे कपडे धुण्याचे झाले असताना ती दोन मुले पाण्यात पोहत असताना अचानकपणे त्या खोल खड्ड्यात पडल्याने बुडू लागले त्यावेळी त्या दोन महिला त्याना वाचवण्यासाठी गेल्या असता त्या देखील बुडाल्या.
यातील मुलगा 13वर्षाचा मुलगी आठ वर्षाची तर महिला 30 व 36 वर्षाच्या असल्याचे समजते
या घटनेची खबर पोलिसांना कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील पो नि रणजित माने हे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले
त्यांनी त्या चार मृत देहांचा तातडीने शोध घेत सायंकाळी सहा पर्यंत चारही मृत देह बाहेर काढले असून शवविछेदन करण्यासाठी मंगळवेढा येथे आणले आहेत या घटनेची फिर्याद वृत देईपर्यंत दाखल झाली नव्हती.
या घटनेमुळे सिद्धापूर गावात शोककाळा पसरली आहे या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांबरोबर गावातील युवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या परराज्यातील कुटुंबावर ही दुःखद वेळ आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज