टीम मंगळवेढा टाईम्स ।
घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज मंगळवेढ्यात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. यावेळी चित्रपटाची सर्व टीम त्यांच्या सोबत होती.
यावेळी मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी या टीमचे स्वागत केले. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी दाखवल्यानंतर नागराज आणि त्यांच्या टीमने प्रेक्षकांशी संवाद साधला.
हा चित्रपट सैराट पेक्षा अधिक कमाई करेल, फक्त रडूनच डोळ्यातून पाणी येतं, असं नाही. हे हा चित्रपट पाहून लक्षात येईल, असे सांगत आता साऊथ वाले देखील घर बंदूक बिरयानी या मराठी चित्रपटाचा रिमेक करतील, असा दावा आ.समाधान आवताडे यांनी केला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिनदर, तहसीलदार स्वप्नील रावडे, रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा, पोलीस निरीक्षक रणजित माने, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, भाजपचे जिल्हासरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी नगरसेवक चंद्रकांत पडवळे आदीजन उपस्थित होते.
प्रेक्षकांच्या गर्दीमुळे आम्ही सर्वच भारावून गेलो असून एक पॉझिटिव्ह ऊर्जा आम्ही येथून घेऊन जात असल्याचे अभिनेता आकाश ठोसर याने बोलताना सांगितले.
गेले काही दिवस प्रमोशनसाठी फिरत असताना कालपर्यंत मला खूप डाऊन वाटत होते. पण आज दामाजी व विठ्ठलाच्या दर्शनाने मी पूर्ण चार्ज झाल्याचे आकाशने सांगितले.
नागराजच्या टीममध्ये आरची उर्फ रिंकू राजगुरू दिसत नसल्याने, याबाबत विषय चढला असता नागराज मंजुळे म्हणाला की, तिच्या सारखा रोल असेल त्यावेळी ती पुन्हा दिसेल.
या चित्रपटात त्याने अभिनय केल्याचे सांगताना हा चित्रपट मोठा धमाका करेल असा विश्वास व्यक्त केला. नागराजच्या चित्रपटातील नायिकेची तुलना आर्चिसोबत होईल अशी भीती वाटते का? असं सायली पाटीलला विचारले असता तिने असं काहीही वाटत नसल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज