टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मंगळवेढा या कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी सेविका मिनी सेविका व मदतनीस पदांकरिता २०२३ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून
त्याचे उमेदवारी अर्ज दि.१० मार्च २०२३ पासून भरण्यास प्रारंभ झालेला असून उमेदवारांची अंतिम निवड यादी दि.२७ एप्रिल २०२३ रोजी प्रकाशित होणार आहे.
तरी तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत मधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी केले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील रिक्त अंगणवाडी सेविका केंद्रांची नावे –
मरवडे बीट मधील जित्ती (गावठाण), सलगर बीट मधील सलगर (खू.) क्रमांक १.
रिक्त अंगणवाडी मदतनीस केंद्रांची नावे – आंधळगाव बीट मधील आंधळगाव क्रमांक २, लक्ष्मी दहिवडी बीट मधील उन्हाळेवाडी (पाटखळ), बोराळे बीट मधील पाटखळ क्रमांक १,
ब्रह्मपुरी बीट मधील ब्रह्मपुरी क्रमांक २, जगतापवस्ती, मित्रनगर, दामाजीनगर, बिलेवस्ती, भोसे बीट मधील कोळेवाडी, शिरनांदगी, हुन्नूर, महमदाबाद (हु), उन्हाळे वस्ती (डोंगरगाव),
मरवडे बीट मधील कागष्ट (गावठाण), सांगोलकरवस्ती, तळसंगी – मुंगसेवस्ती, लक्ष्मी दहिवडी क्रमांक ३, नंदेश्वर बीट मधील लक्ष्मी दहिवडी क्रमांक ४,
मासाळवाडी, सलगर बीट मधील आसबेवाडी, सलगर (बु) १, शिवणगी क्रमांक २, बावची, मुंढेवाडी क्रमांक १, सिद्धापूर क्रमांक १, नंदूर कमलापुरेवस्ती, भालेवाडी (गावठाण) तरी वरील पद्धतीने संबंधित बीटमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे रिक्त आहेत.
भरती प्रक्रियेचे वेळापत्रक प्रत्येक ग्रामपंचायतला पाठवलेले असून सदर पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मार्च २०२३आहे.
उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याची तारीख १० एप्रिल आहे. प्रकाशित झालेल्या यादीवर आक्षेप नोंदवण्याची तारीख २१ एप्रिल आहे व अंतिम यादी दिनांक २५ एप्रिल रोजी प्रकाशित होणार असून निवड यादी दि.२७ एप्रिल रोजी प्रकाशित होणार आहे.
तरी पात्र उमेदवारांनी सदर पदांसाठी आवश्यक पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज