टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा एसटी.आगार प्रमुख म्हणून संजय भोसले यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
दरम्यान,एस.टी.चे उत्पन्न वाढविणे,प्रवाशांना चांगली सेवा देणे, वेळापत्रकाप्रमाणे वेळेवर गाडया सोडणे हे माइया सेवेतील महत्वाचे कार्य असेल असे त्यांनी पदभार घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
आगार प्रमुख मधुरा जाधवर यांची पदोन्नतीवर बार्शी येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर संजय भोसले हे मलकापूर जि.कोल्हापूर येथून आले आहेत.
त्यांनी आत्तापर्यंत सोलापूर, अकलूज, पंढरपूर, करमाळा, कुर्डूवाडी, अक्कलकोट येथे सेवा बजावली आहे. ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील असून 1991 मध्ये एस.टी.महामंडळात दाखल झाले आहेत.
उत्कृष्ठ सेवेबद्दल त्यांना आत्तापर्यंत दोन पुरस्कार मिळाले आहेत.मंगळवेढा बसस्थानकावरील सिमेंटचे पत्रे फुटल्यामुळे पावसाळयात प्रवाशांचे हाल होत असल्याने याची दखल घेवून भोसले यांनी
प्रथमतः बसस्थानकाची दुरुस्ती करणे,परिसर स्वच्छ ठेवणे,प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी देणे आदी प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
याचबरोबर आगारात काम करणारे चालक व वाहक यांच्याही अडीअडचणी समजून घेवून त्यांच्याही प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज