टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यातून बेपत्ता झालेला 15 वर्षीय मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना मिळून आला आहे.
तु बोडींग शाळेत का जात नाही, असे वडिल विचाचारताच रागाच्या भरात बेपत्ता झालेला होता.
शिवराज भोसले, रा हाजापूर, ता. मंगळवेढा असे मृताचे नाव असून मंगळवेढा पोलिसाना वडिल बसंती मुकेश भोसले यांनी खबर दिली. अकस्मात मयत म्हणून नोंद झाली.
दि.१७ जानेवारीला रोजी दुपारी १२ वाजता मंगळवेढ्यातील दामाजी चौकातून शिवराज भोसले याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्याच्या कुटूंबियानी दिली होती.
नातेवाईक व पोलीस त्याचा शोध घेताना गुरुवारी रवी काळे याना शिवराज जुना मारापूर रोडने शांतीनगर येथे सुबाभळीच्या झुपडात वायरच्या पिशवीच्या बंधाच्या गळफास घेतल्याचे आढळला.
शिवराजचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरानी मृत घोषित केले. तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
वडिलांनी त्याला बोडींग शाळेत का गेला नाही असे विचारल्याचा राग मनात धरून तो निघून गेला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज