टीम मंगळवेढा टाईम्स।
नुकतीच मंगळवेढा तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. माजी आमदार श्री प्रशांत परिचारक व समविचारी आघाडीचे प्रमुख यांनी ही निवडूक प्रतिष्ठेची केलेली होती.
पहिल्या टप्यात झालेल्या निवडणुकीत १८ ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायतीवर परिचारक व समविचारी आघाडीने प्रभूत्व गाजवून मोठ्या फरकाने विजयाचा झेंडा फडकविला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
निवडणूक झालेल्या गावामध्ये श्री संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे तळसंगी गांवावर एकहाती वर्चस्व दिसुन आले.
मारोळी ग्रामपंचायतीवर श्री.संत दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील व त्यांचे सहकारी खुदबुददिन शेख यांचे वर्चस्व राहिले आहे.
गोणेवाडी येथे रामेश्वर मासाळ व बाबसाो मासाळ यांनी सत्ता अबाधीत ठेवली आहे, बावची येथे राजेंद्र गाडवे यांनी विजय संपादन केला आहे. हाजापूर येथे माधवानंद आकळे व सहकारी यांनी निवडणुक जिंकली आहे.
शिरनांदगी येथे गुलाब थोरबोले आणि सहकारी यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे पौट येथे बाळासाहेब सांगोलकर व सहकारी यांनी सत्ता काबीज केली आहे.
भालेवाडी येथे पिंटु गवळी व महादेव दवले यांनी सत्ता खेचुन आणली आहे. येड्राव येथे काशिनाथ पाटील , रमेश पाटील आणि मल्लु पाटील यांनी सत्ता कायम ठवेली आहे.
ढवळस या ग्रामपंचायतीवरश्री हेंबाडे गुरुजी व सज्जन बावचे यांनी वर्चस्व गाजविले आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक व समविचारी आघाडीच्या ताब्यात वरीलप्रमाणे तळसंगी, मारोळी, गोणेवाडी, बावची, हाजापुर, शिरनांदगी, पौट, भालेवाडी येड्राव व ढवळस या दहा ग्रामपंचायतीवर दिमाखदार विजय मिळवला असुन
यापूर्वीच फटेवाडी ग्रामपंचायत औदुंबर वाडदेकर आणि रावसाहेब फटे यांनी परिचारक व समविचारी आघाडीचे माध्यमातुन बिनविरोध काढलेली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीवर प्रशांत परिचारक व समविचारी आघाडीचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे .
नुकत्याच पार पडलेल्या संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्येही समविचारी आघाडीने कारखान्याची निवडणूक लढवून विजय मिळविलेला होता.
या ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा चेअरमन तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर,
जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, कारखान्याचे संचालक भारत बेदरे ,बसवराज पाटील, गौरीशंकर बुरकूल, श्री गोपाळ भगरे, दिगंबर भाकरे,तानाजी कांबळे यांनी पुष्पहार व फेटा बांधुन केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज