टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपलाच वरचष्मा असल्याचे दावे भाजप प्रणित आमदार आवताडेसह परिचारक, भालके गटाने केले आहेत.
मारापूर, येड्राव, गुंजेगाव, डोंगरगाव, खोमनाळ, हाजापूर, रहाटेवाडी, सोड्डी व भालेवाडी गावात आमदार समाधान आवताडे गटाने सरशी केली, तर तळसंगी, गोणेवाडी, पौट या गावात परिचारक गटाचा वरचष्मा राहिला आहे.
मंगळवेढा तालुक्यात आमदार आवताडे गटाच्या घटक आघाड्यांनी वर्चस्व राखले आहे.
बावची व पाटखळ ग्रामपंचायतमध्ये बबनराव आवताडे गटाने यश मिळवले आहे. तर भालके गटाने शिरनांदगी ग्रामपंचायत व मारोळी येथे संत दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील यांनी सरपंचपदाचे उमेदवार राजकुमार रामगोंडा पाटील यांना सर्वाधिक 556 मतांनी विजयी करण्याची भूमिका पार पाडली.
तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना धक्का बसला आहे. मतदारांनी प्रस्थापितांना घरी बसवुन नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे.
पाटखळ गाव बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणारे सरपंच पदाचे उमेदवार आनंद ताड यांना केवळ 35 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकांत स्थानिक सर्वच आघाडी व पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, त्यामध्ये आमदार समाधान आवताडे गटाने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे. खोमनाळ व गुंजेगाव येथील दोन उमेदवारांना समसमान मते पडल्यामुळे त्यांची निवड चिठ्ठीद्वारे केली आहे.
मारापूर, येड्राव, गुंजेगाव, डोंगरगाव, खोमनाळ, हाजापूर, रहाटेवाडी, सोड्डी व भालेवाडी ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील राहटेवाडी व फटेवाडी अशा दोन ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या.
सरपंचपदाचे विजयी उमेदवार;
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज