टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दराने दिली जाणारी साखर दिपावली सण २०२२ करिता
मंगळवेढा तालुक्यातील सभासदांचे सोईनुसार २५ ठिकाणी केंद्रनिहाय वाटप केलेली आहे.
अद्यापही कांही सभासदांनी साखर उचललेली नाही अशा राहिलेल्या सभासदांची साखर यापुढे दर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कारखाना साईटवरील सभासद साखर विक्री केंद्रातून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
तरी ज्या सभासदांची साखर राहिलेली आहे त्यांनी घेवून जावे असे आवाहन चेअरमन शिवानंद यशवंत पाटील यांनी केले आहे.
सभासदांच्या सोयीचे दृष्टीने सदरची साखर आज दि २५ नोव्हेंबर पासून प्रत्येक शुक्रवारी मिळणार आहे तरी सभासदांनी राहिलेली साखर ३१ डिसेंबरपूर्वी घेवून जाण्याचे आवाहनही त्यांनी सदर प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर,भारत बेदरे,बसवराज पाटील,राजेंद्र चरणु पाटील, प्रा.रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, दयानंद सोनगे,
दिगंबर भाकरे,महादेव लुगडे,सुरेश कोळेकर, तानाजी कांबळे यांचेसह कार्यकारी संचालक सुनिल दळवी व सर्व खातेप्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते.
म्हणून पतीने केलं पत्नीचं टक्कल, सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वीस वर्षीय पत्नीचे पतीने चक्क टक्कल केले आहे. पुरुषाकडे पाहू नये म्हणून पतीने पत्नीची टक्कल केली असल्याची माहिती समोर आली आहे.
ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली, त्यावेळी उघडकीस आली.
पत्नीने सर्व घडलेला प्रकार पोलीस ठाण्यात आल्यावर सांगितला तेव्हा ऐकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला.
पीडित पत्नीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सासू राजिया सत्तार चौधरी, सासरे सत्तार चौधरी आणि पती कलीम सत्तार चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी काय घडली घटना?
मे महिन्यात पीडितेचा विवाह जोड बसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर काही त्यांचा संसार हा सुखात सुरु होता. मात्र, काही दिवसांनी पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली.
आणि पीडितेच्या पतीने संशय घेत, तिला तुझे केस मला आवडत नाहीत, असे म्हणत तिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले.
हे ऐकून पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पतीला डोक्यावरील केसं काढण्यास सक्त नकार दिला. त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्याशी चक्क बोलणे बंद केले.
जेवण न करणे मारहाण करणे अशी वागणूक सुरु केली. पतीने सुरु केलेल्या अशा वागणुकीमुळे पत्नी कंटाळली आणि तिने केसं काढण्यास होकार दिला.
तिचे केस कापण्यासाठी पार्लरवाल्याला बोलावण्यात आले आणि त्यावेळी पिडीतेन विरोध केला नंतर ती नाईलाजाने शांत राहिली, अशी माहिती पीडितेच्या आई-वडिलांनी दिली आहे. यापुढे जाऊन सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता.
पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसानंतर माहेरच्या लोकांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. त्यावेळी पतीने पीडितेला घरी नेऊन सोडले. त्यावेळी पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली.
आपल्या मुलीचे केस जावयाने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काढल्याचे पिडीतेच्या कुटुंबियांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस ठाण्यात पती, सासू सासरे यांच्या विरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज