टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील भिमनगर परिसरात तिरट नावाचा जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व चार मोटर सायकलसह 75 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, जुगार खेळणारे पोलिसांना पाहताच पळून गेल्याने अज्ञात चौघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,गोणेवाडी येथील भिमनगर परिसरात तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळताच
त्यांनी पोलिस हवालदार मोरे, पोलिस कॉन्स्टेबल सुरज देशमुख व अन्य पोलिसांना पाठवून खातरजमा केली असता दि.18 रोजी 5.15 वा. समाज मंदिराच्या बाजूस असलेल्या
झाडाखाली यातील अज्ञात चार जण 52 पानाच्या पत्त्यावर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
मात्र पोलिसांना पाहताच त्यांनी घटनास्थळावर रोख रक्कम,मोटर सायकली असा एकूण 75 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवर सोडून धुम ठोकली.
पोलिसांनी अज्ञात चौघांविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे पोलिस शिपाई वैभव घायाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज