टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथील महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी मध्ये आज मंगळवार दि.13 सप्टेबर ते शुक्रवार दि.16 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ.पुष्पांजली शिंदे यांनी दिली आहे.
महसुल पोलिस, पोस्टमन, वीजवितरण कंपनी, शिक्षक, आरोग्य कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारीयांच्या सह इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी
तसेच आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांना शिबीरा मध्ये तपासणी साठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्व सामान्य नागरिक ही या शिबीराचा लाभ घेऊ शकतील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉ.विलास तोंडे पाटील, डॉ.दिपक गायकवाड, डॉ.प्रमोद पवार, डॉ.अमजद सय्यद,
डॉ.सुनील शेवाळे यांच्या सह वैद्यकीय क्षेत्रातील टीम मोफत महाआरोग्य शिबीरात सेवा बजावणार आहे.
खालील लिंक वर क्लिक करून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी फॉर्म भरावा;
https://forms.gle/BXyTwpykKezJ3u3M9
‘या’ टेस्ट होणार मोफत
महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी मध्ये 13 ते 16 सप्टेबर 2022 या कालावधी होणाऱ्या महाआरोग्य शिबीरात बी.पी, शुगर, ईसीजी या टेस्ट मोफत केल्या जाणार आहेत.
2 डी इको, ट्रेड मील टेस्ट, इतर रक्ताच्या तपासण्या 50 टक्के सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.
अॅन्जिओग्राफी टेस्ट करीता 3000 ( तीन हजार ) शुल्क आकारले जाणार आहे. केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना अगदी मोफत अॅन्जिओप्लास्टीची सोय करण्यात आलेली आहे.
प्रथमच मंगळवेढ्यात महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी मध्ये शुगर असणाऱ्या रुग्णांना नसांची तपासणी ( न्यूरोपॅथी ) करण्यासाठी अत्याधुनिक Neuro Touch मशिन उपलब्ध होत आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्स धारकांना मेडीक्लेमची सेवा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उपलब्ध आहे.
तरी या शिबिरातील सुविधाचा लाभ घ्यावा आणि 02188 221777 , 9970796978 9423583607 9168101777 वरील क्रमांक वर संपर्क करावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज