टीम मंगळवेढा टाईम्स ।
जयवंतराव पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून शिवणे (ता.सांगोला) येथील गोरख आनंदा घाडगे यांना साठ हजार रुपये कर्ज देण्यात आले होते. सदरचे कर्ज हे थकीत गेले होते.
यावेळी थकीत कर्जदार गोरख घाडगे यांनी घेतलेल्या कर्जाच्या थकीत येणे बाकी पोटी ५३ हजार ८१० रकमेचा धनादेश (चेक) पतसंस्थेला दिला होता.
परंतु, गोरख घाडगे यांच्या खात्यावर चेक वटण्याइतकी रक्कमच नसल्याने सदरचा चेक न वटता जयवंतराव पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस परत आला.
घाडगे यांच्या विरुद्ध सांगोला येथील फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यान्वये फौजदारी केस दाखल करण्यात आली होती.
या केसचा निकाल दि.२९ ऑगस्ट रोजी सांगोला येथील फौजदारी न्या. एस.के. देशमुख यांनी दिला आहे. गोरख घाडगे यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
एक महिना तुरुंगवासाची शक्षिा व फर्यिादी पतसंस्थेस नुकसान भरपाई म्हणून ८५ हजार रुपये देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. तसेच सदरची रक्कम मुदतीत न दल्यिास सहा महन्यिाची तुरुंगवासाची शक्षिा सुनावली आहे.
फर्यिादी संस्थेतर्फे ॲड. मदन देशपांडे यांनी तर आरोपी गोरख आनंदा घाडगे यांच्यातर्फे ॲड. पी.एस. पाटील यांनी कामकाज पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज