टीम मंगळवेढा टाईम्स।
माचणूर (ता. मंगळवेढा) येथील सिध्देश्वर मंदिरातील ऐन गणेश चतुर्थी दिवशी गणपती मूर्तीच्या फरशीची तोडफोड करणाऱ्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत सध्दिेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा नर्णिय माचणूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतला आहे.
दरम्यान, जल्हिा प्रशासन व पोलीस प्रशासनातील वरष्ठि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत ग्रामस्थांशी चर्चा केली. दि. ३१ रोजी येथील सद्धिेश्वर मंदिरातील गणपती मूर्तीच्या फरशीची तोडफोड पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली होती.
ग्रामस्थांनी जर येथे चुकीचे बांधकाम केले असले तर संबंधित पुरातत्व खात्याचे अधिकाऱ्यांनी मंदिर समिती अथवा ट्रस्टला याबाबत नोटीस देऊन कल्पना देणे गरजेचे होते.
परंतु तसे न करता आणि गणेश चतुर्थी दिवशी येथे तोडफोड केल्याने भाविकभक्तांतून तीव्र संताप व्यक्त होत होता.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाल्याने आज १ सप्टेंबर रोजी आमदार समाधान आवताडे, भगीरथ भालके, दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी प्रत्यक्ष मंदिरात येऊन संतप्त भाविकांच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी भाविकांनी पुरातत्व खाते येथील मंदिराच्या पडझडीकडे दुर्लक्ष करीत असून त्यांना वारंवार दुरुस्तीची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच मंदिराची दुरुस्ती आम्हाला देखील करू देत नाही. ही पुरातत्व विभागाची आडमुठी भूमिका असून येथील ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे ज्यांनी या मंदिरातील तोडफोड केली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा; अन्यथा मंदिर बंद ठेवण्याचा नर्णिय यावेळी भाविकांनी प्रशासनास सांगितला. त्यावेळी प्रशासनाकडून उलट भाविकांना सबुरीचा सल्ला दिला जात होता.
परंतु ग्रामस्थ व पुजाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांसमोर पुरातत्त्व खात्याने वेळोवेळी केलेल्या हुकूमशाहीचा पाढाच वाचून दाखवला.
सिध्देश्वर मंदिर हे पुरातन स्मारक नसून मंदिर असल्याने पुरातत्त्व खात्याच्या कचाट्यातून याची मुक्तता करावी, अशी मागणी केली. या खात्याच्या कंत्राटी सफाई कामगाराकडून कधीही मंदिराची सफाई करत नसून, पुजाऱ्यांना व भाविकांना कायद्याचा धाक दाखवून अरेरावी केली जाते, असे सांगितले.
भाविकांचा संताप पाहता पुरातत्त्व विभागाचे महादेव कांबळे यांनी टाईल्सचे काम नवीन पध्दतीने केल्याने ते काढले असून सहा दिवसात खात्याच्या निकषांनुसार पूर्ववत दुरुस्ती करून देऊ, असे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी तिथेच त्यांना पुरातत्त्व खात्याने यापूर्वी मंदिरात केलेल्या अत्यंत निकृष्ट कामाचा आरसा दाखवून सर्वांसमोर निरुत्तर केले.
यावेळी प्रांताधिकारी समिंदर यांनी या घटनेप्रकरणी तात्काळ समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे ग्रामस्थांसमोर जाहीर केले.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या या कृत्यामागे काही कारस्थान आहे का, हे तपासून तोडफोड केलेला भाग पूर्ववत करण्याचे प्रयत्न करू, असे सांगितले.
‘वठ्ठिल’चे माजी चेअरमन भगीरथ भालके म्हणाले, अफझलखानाने ज्या क्रूर पध्दतीने हिंदू मंदिराची तोडफोड केली त्या पद्धतीने पुरातत्व खाते नष्ठिुरपणे वागत असून, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना जल्हिाप्रमुख गणेश वानकर, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, प्रहारचे राजकुमार स्वामी, युवा सेनेचे राज्य समन्वयक शरद कोळी आदींनी मंदिरास भेट देऊन घटनेचा निषेध करत ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी सदर ठिकाणी भेट देऊन परस्थितिीची पाहणी केली व भाविकांना शांततेचे आवाहन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज