टीम मंगळवेढा टाईम्स ।
कॅथलॅब सारखी सुविधा मंगळवेढ्यात विशेष म्हणजे महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी येथे सुरू झाली ही खूप आनंदाची बाब असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉ.शीतल शहा यांनी काढले आहेत.
महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी येथे अद्यावत कॅथलॅब व फिजिओ थेरपी युनिटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
डॉ.शहा पुढे बोलताना म्हणाले की, सर्व गुणसंपन्न असे डॉ.शिंदे दाम्पत्य असल्यामुळे रूग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांची सोलापूर, पंढरपूर व इतर ठिकाणी जाण्याची वेळ न येता सर्व सुविधा आता मंगळवेढ्यात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम बोलताना म्हणाले की, एक वर्षभर मी इथे येऊन सेवा देत आहे. डॉ.शिंदे यांनी रुग्णांची हेळसांड थांबण्यासाठी कॅथलॅब ही सुविधा सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.पुष्पांजली शिंदे बोलताना म्हणाल्या की, सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. अभिमान आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोरोनामध्ये आम्ही अनेक महिलांच्या गुंतागुंतीच्या डिलिव्हरी मोफत केल्या आहेत. कॅथलॅबच्या माध्यमातून आम्ही सर्व रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही देणार असल्याचे डॉ.पुष्पांजली शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी नामदेव गायकवाड,महादेव शिंदे,डॉ.पुष्पांजली शिंदे,डॉ मधुकर कुंभारे ,डॉ.अरविंद गिराम,डॉ.विनायक जोशी,डॉ.लक्ष्मीकांत मर्दा,डॉ.अमित गुंडेवार,डॉ. श्रीराज काणे,डॉ.दीपक गायकवाड,डॉ.शरद शिर्के,डॉ.विलास तोंडेपाटील,
डॉ सुनील जाधवडॉ.अमजद सय्यद ,डॉ.नंदकुमार शिंदे, डॉ. दीपक गायकवाड, ,डॉ. प्रसाद कोरूलकर, डॉ. विवेक निकम, डॉ सुरेश होनमाने
डॉ. अमित पावले, डॉ.प्रीती शिर्के ,डॉ. सचिन बेलदार,
डॉ. धनराज नवत्रे, डॉ. सीमा इंगोले पाटील ,डॉ. बी के पडवळे,डॉ दत्तात्रय शिंदे ,डॉ दत्तात्रय क्षीरसागर ,सतीश डोके, डॉ काशिनाथ वाले , शरण बिराजदार , अमोल निकम,विजय बुरकुल, बाबा कोंडूभैरी,संतोष पवार, संतोष कोळसे ,
बाळासाहेब जमादार ,श्रावण मोरे ,सुनील जाधव, संतोष गवंडी , सोमनाथ इंगळे,श्रेयस कुलकर्णी ,रघुनाथ शिंदे , रुग्णालय कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले. आभार दावल इनामदार यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज