टीम मंगळवेढा टाइम्स ।
भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या कडून तसे अधिकृत पत्र माध्यमांसमोर आले आहे.
माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे महिलेच्या प्रकरणात अडकल्याने त्यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
तेव्हापासून भाजपचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. या पदासाठी अनेकांची नावे समोर आली. त्यामध्ये विजयराज डोंगरे, धैर्यशील मोहिते पाटील, संतोष पाटील, शिवाजी कांबळे यांचा समावेश होता.
भारतीय जनता पार्टीने अखेर जिल्ह्यातील आमदार असलेल्या कार्यकर्त्याला पसंती दिली असून त्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली आहे.
सोलापूर शासकीय विश्रामगृहावर येत्या दोन दिवसात भारतीय जनता पार्टीचे खासदार सर्व आमदारांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कल्याणशेट्टी यांचा राजकीय प्रवास पाहता अतिशय भरारी घेणारा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे ते समजले जातात.
माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याही ते जवळचे आहेत. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावचे सरपंच, भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष
त्यानंतर आमदार आणि आता जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे तालुका मध्ये त्यांची चांगली पकड आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज