टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानाचा तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून
२ लाख १२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेशवाडी येथील दत्तात्रय भोसले यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलिस निरीक्षक रणजित माने यांना मिळताच पोलिसांच्या पथकाने ४:३० वाजता सदर जुगार अड्डयावर धाड टाकली असता
एकत्र गोलकार बसून ५२ पत्याच्या तीन पानाचे तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
संशयित आरोपी महादेव विठ्ठल इंगळे (वय ६५), बलभीम रामचंद्र अनपट (वय ६३), समाधान सदाशिव कदम (वय ३६), विजय मच्छिंद्र तानगावडे (वय ३९ ), संतोष जनार्धन वाकडे (वय ३५), बापू विष्णू आवताडे (वय ५०),
उत्तम मच्छिंद्र तानगावडे, समाधान हरी दतू ( वय ३८ ), सिध्देश्वर भारत आवताडे (वय २५. सर्व रा.गणेशवाडी) , पांडुरंग सिध्देश्वर मगर (वय ३६ सर्व रा.शेलेवाडी)
तीन पानाचा तिरट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगार साहित्य, मोटारसायकली , मोबाइल , रोख रक्कम असा २ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज