टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पोलीसांनी तालुक्यातील बठाण येथील हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अडडयावर टाकलेल्या धाडीत 4 लाख 41 हजार 270 ऐवज हस्तगत करण्यात आला.
या कारवाईने जुगार खेळणाऱ्याचे धाबे दणाणले असून पोलीस निरीक्षकपदी रणजित माने यांनी पदभार घेतल्यानंतरची पहिलीच सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षक धापटे,सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे,वाघमोडे,पोलिस हवालदार महेश कोळी,पोलिस नाईक विठ्ठल विभुते,
पोलिस शिपाई पोरे आदी मोहरम सणानिमित्त पेट्रोलिंग करीत असताना पो. नि. रणजित माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत
बठाण येथे पिंटू कोळी यांच्या हॉटेलच्या पाठीमागे काही लोक पत्त्याच्या पानावर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती समजली.
त्यांनी तात्काळ समजलेल्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचना दिल्याने सदर पोलिसांचे पथकाने जुगार अड्डयावर छापा टाकला.
यावेळी वरील सर्व आरोपी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.पहिल्या घटनेत बठाण येथील अमोल अशोक कोळी यांच्या हॉटेलच्या मागे अंकुश चिंतु शिंदे रा बठाण रफिक महमंद मुलाणी नागणेवाडी,
हे जागीच सापडले तर अमोल अशोक कोळी,आण्णासो भगवान बेदरे,हणमंत हरीदास बेदरे,संजय महादेव जाधव दत्तात्रय संभाजी बेदरे,दिगंबर अर्जुन घोडके,संभाजी अशोक कोळी सर्वजण रा.बठाण क्लबचा चालक
अमोल अशोक कोळी असल्याचे सांगीतले वरील संशीयाताची तपासणी केली असताना रोख रक्कम व दुचाकी असा 2 लाख 30 हजार 480 रु ऐवज हस्तगत करण्यात आला तर दुसय्रा घटनेत क्लब चालक
शत्रुघ्न उर्फ पिंटू विठ्ठल कोळी (वय 37),श्रीमंत मसाजी भालेराव (वय 47),ज्ञानेश्वर औदुंबर बेदरे(वय 34) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर ज्ञानेश्वर तुकाराम बाबर,
किसन विलास शिंदे,नेताजी जालिंदर शिंदे,कल्याण नागनाथ बाबर,गुंडोपंत भानुदास बाबर,महेश विठ्ठल सुतार हे आरोपी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
पोलिसांना तिघांना पकडण्यात यश आले तर सहा जण फरार झाले.या आरोपीविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून
त्या सहा फरार आरोपींचा कसून शोध पोलिस घेत आहेत.या छाप्यामध्ये रोख रक्कम व दुचाकी असा एकूण 2 लाख 10 हजार 790 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज