टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकांमध्ये विश्वास निर्माण करून ठेवी मिळविणे, हे खऱ्या अर्थाने धनश्रीच्या दोन्ही संस्थेचे यश आहे. सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री परिवाराने वाटचाल केली आहे.
धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टी स्टेटच्या प्रगतीत संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचे मोलाचे योगदान असून आपण सर्वांनी आजपर्यंत दाखविलेला विश्वासामुळे धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टी दोन्ही संस्थेने एक हजार कोटीचा टप्पा पार केला आहे. असे प्रतिपादन धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.
धनश्री महिला पतसंस्थेची 26 वी धनश्री मल्टीस्टेटची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी 11.00 वा. वीरशैव मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाली. याप्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे, व्हा. चेअरमन प्रभावती कनशेट्टी, धनश्री मल्टिस्टेटचे व्हा.चेअरमन युवराज गडदे, संत कुर्मदास कारखान्याचे चेअरमन माजी आमदार धनाजी साठे,
संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा तानाजी खरात, सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव,
सांगोला सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे, उद्योजक उध्दव बागल, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, दयानंद सोनगे, मारुती सावंत, यादाप्पा माळी,
डॉ. एम.आर टकले, शिवाजीराव पवार, ज्ञानदेव जावीर, किसन सावंजी, रामचंद्र बंडगर, राजाराम सावंत, गणेश जाधव, सतिश दत्तू, युवा उद्योजक सुयोग गायकवाड, मनिषा कुंभार, सुवर्णा पवार, संगीता सावंजी, कल्पना गडदे,
स्नेहल सावंत, गोकुळा जावीर, सुनीता नागणे, सुरेखा कलुबर्मे, यमुना शिंदे, शकुंतला लिगाडे, अविनाश चव्हाण, उमाकांत कनशेट्टी, प्रभाकर कलुबर्मे, दत्तात्रय नागणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व मल्टीस्टेटचा दशकपुर्ती सोहळा लवकरच साजरा करणार आहोत.
या दोन्ही संस्थेचे एक हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारची मंगळवेढा तालुक्यातील एक हजार कोटी ठेवीची संस्था म्हणून सर्व ठेवीदार,खातेदार, सल्लागार, संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून एकमेव ठरली आहे.
सभासदांना 10 व 11 टक्के लाभांश जाहिर
चालू आर्थिक वर्षात धनश्री महिला पतसंस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश व धनश्री मल्टीस्टेटच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहिर केला आहे.
अत्यंत कमी कालावधीमध्ये या दोन्ही संस्थेने उत्तुंग अशी घोडदौड करत यशाच्या टप्प्याकडे ही संस्था वाटचाल करीत आहे. समाजाचे एक ऋण म्हणून यापुढेही धनश्री परिवारात काम करत राहू.
प्रा.शोभाताई काळुंगे म्हणल्या, धनश्री परिवारातील दोन्ही संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळा बरोबरच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व प्रामुख्याने अत्यंत तत्पर विनम्रपणे सर्वांना सेवा देणारे कार्यक्षम कर्मचारीवृंद यांचे मोलाचे योगदान आहे.
स्पर्धेच्या युगात देखील संस्थेचे कर्मचारी सर्व कायदेशीर बाबी समजून घेऊन बँकचे कामकाज करत आहेत. आजच्या काळात पात्र आणि वेळेवर कर्जाची फेड करणाऱ्या कर्जदारांची बँकेला नितांत गरज आहे.
धनश्री पतसंस्थेला 2021- 2022 आर्थिक वर्षात सर्व तरतुदी करून 2 कोटी 13 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे.
तसेच धनश्री मल्टिस्टेटला 2021- 2022 आर्थिक वर्षात सर्व तरतुदी करून 2 कोटी 76 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे.
धनश्री पतसंस्थाच्या 26 वर्षात 14 शाखांपैकी 10 शाखेने स्वमालकीच्या इमारती उभ्या केल्या आहेत. तर धनश्री मल्टिस्टेटने 11 वर्षात 33 शाखांपैकी 13 शाखांसाठी स्वमालकीच्या जागा खरेदी केल्या आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
धनश्री महिला पतसंस्थेला 2 कोटी 13 लाख इतका नफा
यावेळी धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवित या वर्षी संस्थेने सभासदांना 11 टक्के लाभांश देत असून 31 मार्च 2022 अखेर संस्थेच्या 463 कोटी 47 लाख ठेवी आहेत.
त्यामध्ये गतवर्षापेक्षा 69 कोटी 71 लाख इतकी वाढ झाली आहे. तसेच आर्थिक वर्षात 2 कोटी 13 लाख इतका नफा झाला आहे त्याचबरोबर 2021-22 चे अंदाजपत्रकास मंजूरी घेतली.
धनश्री मल्टीस्टेटला 2 कोटी 76 लाख नफा
धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवित संस्थेने 10 टक्के याप्रमाणे लाभांश देत असून 31 मार्च 2022 अखेर संस्थेच्या 555 कोटी 46 लाख ठेवी आहेत.त्यामध्ये गतवर्षापेक्षा 146 कोटी 49 लाख ठेवीची वाढ झाली आहे.
तसेच आर्थिक वर्षात 2 कोटी 76 लाख इतका नफा झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी 2021-22 चे अंदाज पत्रकास मंजूरी घेतली.
उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान
याप्रसंगी धनश्री महिला पतसंस्थेच्या व धनश्री मल्टिस्टेटच्या सर्व शाखेतील उत्कृष्ट खातेदार यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत व सलगर शाखेचे शाखाधिकारी राजू गवळी व धनश्री मल्टिस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे व रड्डे शाखेचे शाखाधिकारी किरण मेहेरकर यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर दोन्ही संस्थेच्या प्रत्येकी तीन शाखेचा उत्कृष्ट शाखा म्हणून गौरव करण्यात आला. तसेच वर्षभर सर्वात जास्त पिग्मी संकलन करणाऱ्या दोन्ही संस्थेतील प्रत्येकी तीन पिग्मी एजंटचा गुणगौरव याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच धनश्री महिला पतसंस्थेचे व मल्टिस्टेटचे सर्व शाखाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन नितीन कदम व राणी उन्हाळे यांनी केले तर आभार माऊली जाधव यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज