टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील झाडाखाली पैशावर 52 पत्तीचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त करून
नऊ जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सिध्दापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळील झाडाखाली ५२ पत्तीचा जुगार पैशावर खेळत असल्याची गोपनीय माहिती
उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षक पुरुषोत्तम धापटे,
पोलिस हवालदार महेश कोळी, पोलिस शिपाई सोमनाथ माने, बजरंग कोळी, हत्ताळी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता
त्यांना झाडाखाली काही लोक गोलाकार बसून ५२ पत्तीचा जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी आरोपी बसवराज आण्णाराया पाटील (वय ४८), नितीन कोष्टी (वय ३२), साहेबगोंडा पाटील (वय ६३), बाबुशा ढावरे २५ (वय ४५), महादेव म्हेत्रे (वय ६३), सिध्दाराम बिराजदार (वय ६६),
महादेव ढावरे (वय ४६ ), सिध्दाराम मेडिदार (वय ४५), विठ्ठल अंजुटगी (वय ७३ ) यांना ताब्यात घेवून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ प्रमाणे त्यांचेवर कारवाई केली.
घटनास्थळावरून रोख रक्कम ६,१०० , हजार रुपये किमतीची टिव्हीएस कंपनीची एक मोटर सायकल , ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा , ५० हजार रुपये किमतीची हिरा डिलक्स मोटर सायकल असा एकूण १ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याची फिर्याद पोलिस शिपाई सोमनाथ माने यांनी दिली असून अधिक तपास पोलिस नाईक कृष्णात जाधव हे करीत आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागात टाईमपासच्या नावाखाली मोठया प्रमाणात ५२ पत्तीचा जुगार दिवसभर खेळला जात असल्याचे चित्र आहे.
पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी अशा चालणाऱ्या जुगारावर कारवाई करून हा जुगार व्यवसाय हद्दपार करावा अशी मागणी नुकत्याच केलेल्या कारवाईवरून पुढे येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज