टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट करीत वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.
दरम्यान वीज पडल्याने मंगळवेढा परिसरातील एक म्हैस व सोड्डी परिसरातील एक गाय अशी दोन जनावरे मृत्युमुखी पडली.
तुकाराम दिवसे यांच्या शेतात बांधलेल्या म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने म्हैस जागेवर मृत्युमुखी पडली.
दुसरी घटना सोड्डी येथील अडक्याप्पा येडके यांनी बांधलेल्या खिलार गायीच्या अंगावर वीज पडल्याने तिही मृत्युमुखी पडली.
मागील दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने वीज पडल्याने एकंदरीत तीन जनावरे मृत्युमुखी पडली होती. सरासरी ११.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या नैसर्गिक घटनांचा फटका पशुपालकांना बसला असून, तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना दिले आहेत.
सर्वात जास्त पाऊस बोराळे मंडलमध्ये म्हणेजच २१ मिमी पडला , तर सर्वात कमी मारापूर मंडलमध्ये ५ मिमी इतका पडला आहे.
शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. पडलेल्या पावसामुळे हवेतील उष्णता कमी झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून काहीअंशी सुटका झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज