टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने, एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता.मोहोळ) येथे आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
माचणुर ता.मंगळवेढा येथील निकम कुटुंब हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याचा शेतात सालाने कामाला आहेत.
तर हिंगमीरे हे शेटफळ येथीलच कुटुंब आहे, सोमवारी डोंगरे यांच्या शेतामध्ये डाळिंब तोडणीचे काम सुरू होते.
दरम्यान सिद्धार्थ भरत निकम वय.10, विनायक भरत निकम वय.12 (माचनुर ता.मंगळवेढा) व कार्तिक हिंगमीरे, हे तिन्ही बालके शेततळ्याच्या शेजारी खेळत होती,
ते बराच वेळ दिसली नाहीत, त्यांचा शोध घेतला असता शेततळ्यात पडल्याचे दिसून आले.
त्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. हि घटना पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात या तीनही बालकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील असेच तीन बालकांचा खेळत खेळत शेततळ्यामध्ये पडून मृत्यू झाला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज