टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात वाळू उपसा सुरू असलेल्या दोन घाटांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाल्या आहेत.
वाळू घाटांवर हरित लवाद आणि शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आणि व्हिडिओ जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
वाळू घाटावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर मागच्या आठवड्यात मिरी-सिद्धापूर, घोडेश्वर-तामदर्डी या दोन्ही वाळू घाटांवर वाळू उपसा सुरू झाला आहे.
उपसा सुरू होऊन दहा दिवस होत नाहीत तोच दोन्ही घाटांविरोधात अनेक तक्रारी झाल्या आहेत.
रात्री उशिरापर्यंत वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. यांत्रिक मशिनरींचाही (बोटी) वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.(स्रोत:लोकमत)
यांच्याकडे ताबा
मिरी तांडोर साठा क्रमांक १ मंगलमूर्ती स्टोन क्रशर यांनी १२.३४ कोटी , मिरी – सिद्धापूर साठा क्रमांक १ शिक्षंदा लाइफ स्टाइल यांनी ७.९ २ कोटी , घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक १ चौधरी पॉवर प्रोजेक्ट यांनी ३.५३ कोटी, तर घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक २ प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी ५.११ कोटी रुपयांस घेतला आहे.
यापैकी शिक्षदा व प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी १०० टक्के रक्कम यापूर्वी भरली आहे. मिरी – तांडोर येथील साठ्यास सर्वाधिक १२ कोटी ३४ लाख रुपये मिळाले आहेत.
मंगलमूर्ती स्टोन क्रशर यांनी हा मक्ता घेतला आहे. घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक १ चे चौधरी पॉवर प्रोजेक्ट यांनी ३.५३ कोटी रुपयाची रॉयल्टी शासनाकडे जमा केली आहे.
चारपैकी मिरी सिद्धापूर साठा क्रमांक १ शिक्षदा लाइफ स्टाइल , घोडेश्वर तामदीं साठा क्रमांक २ प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र दाखल केल्याने या दोन वाळू साठ्यांचा ताबा ठेकेदारांना दिला गेला. आठ ते दहा दिवसांपासून वाळू उपसा सुरू झालेला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज