टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांचा वाढदिवस नुकताच सामाजिक उपक्रमाने साजरा झाला.
या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दक्षिण भागातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या माध्यमातून सावंत यांनी भविष्यातील राजकीय पेरणी तर नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, अनिल सावंत समर्थक सध्या त्यांच्या चांगल्या कामाची महती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यांनी आतापर्यंत या भागामध्ये राजकारण्यांना लाजवेल असेल भैरवनाथ कारखान्याच्या माध्यमातून विकासाभिमुख काम केलेले आहे.
त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांचे समर्थक त्यांना जिल्हा परिषद गटातून उभारण्यासाठी आक्रमक झाले आहेत.
२००९ पासून मंगळवेढा तालुका हा मतदार संघ पुनर्रचनेनंतर झाली. त्यातूनच स्व.भारत भालके यांना या मतदारसंघातून आमदार होण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या तीन टर्ममध्ये इतरांना डोकावण्याची संधीही दिली नाही.
मात्र २०२० मध्ये त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला ही जागा राखता आली नसली तरी भविष्यातील राजकीय गोळाबेरीज करण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू केले आहे. असले तरी त्यांना मानणारा वर्ग दक्षिण दक्षिण भागांमध्ये अधिक प्रमाणात आहे. त्याचा परिणाम त्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीनंतर दिसून आला.
भोसे जिल्हा परिषद गटांमध्ये गतवर्षी रामचंद्र जाधव यांचा पराभव करून विजयी झालेल्या दिलीप चव्हाण यांना आवताडेमुळे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
परंतु, जिल्ह्याचे नेतृत्व करताना त्यांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी होती. त्यांना ती सिद्ध करता आली नाही. त्यांच्या ताब्यातील आरोग्य खात्यासंबंधी अनेक गैरसोयीचा सामना तालुक्यातील विशेषतः भोसे गटात करावा लागला. त्याचा प्रत्यय कोरोना काळात दिसून आला.
सध्या या गटामध्ये भालके यांचे समर्थक जास्त असल्यामुळे ही जागा भालके गटाला आपण सहज ताब्यात देऊ अशी आशा वाटत आहे. मात्र लवंगीच्या भैरवनाथ शुगर या खाजगी साखर कारखाने आतापर्यंतच्या गाळप हंगामात यंदाच्या हंगामात उच्चांकी गाळप केले आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांचा नुकताच झालेला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून अनेक राजकीय अर्थ तालुक्यामध्ये काढले जात आहेत.
कारखान्यामुळे या भागात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. या भागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या गटातील अनेक गावात देखील या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले होते.
भालके यांना मानणाऱ्या अनेक समर्थकांची अनिल सावंत यांच्याशी चांगले संबंध आहेत. राज्यात २०१९ मध्ये नव्या समीकरणानुसार महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यामुळे तालुक्यात नव्याने प्रस्तावित केलेल्या वाढीव जिल्हा परिषद हे उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी घेऊ शकतात.
तसेच ते स्वतः देखील उमेदवार म्हणून सक्षम असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे.
निवडणूक लढवण्याबाबत सावंत यांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी सध्याच्या राजकीयवरून या भागात चर्चेला ऊत आला आहे. त्यामुळे यापुढील काळात त्यांची भूमिका मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय पटलावर निर्णायक ठरणार आहे, हे नक्की.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज