टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील पोलिसांकडून घर बांधकाम करणाऱ्या सामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचे लेखी निवेदन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे धाडस संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब आसबे यांनी दिले आहे.
दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की, मंगळवेढा तालुक्यातील पोलीसांकडून चोर सोडून सन्याशाला फाशी असा प्रकार सुरू आहे, गेल्या 3 वर्षापासून वाळूचा लिलाव झाला नसलेने ,सामान्य नागरिक जिथून उपलब्ध होईल तेथून मागतील त्या दराने वाळू खरेदी करत आहेत.
सध्या राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू आहे. काही वाहनाने ज्या बांधकामावर वाळू टाकून घेतली आहे, अश्या घरमालकास जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय व गुन्हा दाखल केला जात असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
तर एकीकडे गोरगरीबांचे संसार उद्ध्वस्त होणारे अवैध दारू विक्री, मटका,गुटखा खुलेआमपणे सूरू आहेत, त्यावरती कोणतीही कारवाई होत नाही.
वाळूचा पंचनामा करण्याचे काम पोलीसांच्या अख्तरीत येत नाही ते पोलीस करू लागले आहेत. तरी सदर प्रकरणांची आपण लक्ष घालून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबवावा अशी विनंती धाडस संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब आसबे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज