टीम मंगळवेढा टाईम्स।
महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने पक्षाच्या पदाची सूत्रे त्यांनी सोडली असल्याचे सांगण्यात आले.
चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काॅंग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. चाकणकर यांनी पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या.
त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्याने तेथे चाकणकर यांना संधी मिळाली.
त्यानंतर चित्रा वाघ विरुद्ध चाकणकर यांच्यातील राजकीय वाद राज्यभर रंगला होता. सुरवातीला वाघ यांच्या सहकारी म्हणून काम पाहणाऱ्या रुपाली चाकणकर या नंतर त्यांच्यावर जोरदार टीका करू लागल्या.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. हे पद अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहावे का, अशी नेहमीच चर्चा असते.
त्यांनी आता संघटनेचे पद सोडले आहे. आता त्यांच्या जागी कोणाला महिला राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार, याकडे लक्ष राहणार आहे.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज