टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार हे २५ मार्च रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र मुंबईमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनामुळे तो दौरा पुढे ढकलण्यात आला असून,
मार्चअखेर पूर्वी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येणार असून , दोन दिवसात तारीख निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक शेखर माने यांनी दिली.
खा.शरद पवार यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयामध्ये नियोजन बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समन्वयक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, जनार्दन कारमपुरी,
राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे , महेश गादेकर , महिला अध्यक्षा सुनीता रोटे , लता ढेरे , विद्या लोळगे , लता फुटाणे , जुबेर बागवान आदींसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.
यावेळी शरद पवार यांचा आयोजित केलेला मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा आणि मेळावा यशस्वी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे आणि त्याच अनुषंगाने कनिष्ठ पातळीवर बैठका घेऊन नियोजन करण्याचे आवाहनही पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध गट प्रमुखांना आणि कार्यकर्त्यांना शेखर माने यांनी केले.
या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
सध्या मुंबई येथे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे हा मेळावा महिनाअखेरीस होईल व त्याची तारीख दोन दिवसात कळविण्यात येईल , असे राष्ट्रवादी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले असून , सर्व कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी जय्यत तयारी करावी, असे आवाहन शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले आहे.
बैठकीस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











