टीम मंगळवेढा टाईम्स ।
तीन आनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून खर्डी ता. पंढरपूर ) येथे एका वृद्धाची फसवणूक केल्याची घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
यामध्ये २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील कुंडली त्या भामट्यांनी फसवून नेली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव विठोबा हाके (वय ७५, रा.खर्डी, ता.पंढरपूर) खर्डी गावातील बालाजी यांच्या दुकानामध्ये दाढी करून त्यांच्या घरी जात असताना वाटेत पाठीमागून
एका मोटारसायकलवर दोन इसम आले व हाके यांना म्हणाले की, ओ मामा मास्क घाला , मास्क का घातला नाही.
आम्ही पोलीस आहोत , तुम्हाला २०० रुपये दंड भरावा लागेल , असे म्हणाले. नंतर हाके यांनी तोंडास मास्क घातला त्यानंतर ते इसम हाके यांना तुम्ही पेपर वगैरे वाचता की नाही, आपल्या भागात चोऱ्या खूप होत आहेत.
तुम्ही कानातील कुंडल्या काढून खिशात घेऊन जावा, असे म्हणाले . त्यानंतर हाके त्यांना आता मला काढता येत नाहीत, मी घरी गेल्यावर काढून ठेवतो असे म्हणाले.
त्यानंतर अजून अनोळखी इसम दुसऱ्या मोटारसायकलवर हाके यांच्याजवळ आला व हाके यांना म्हणाला, थांबा मी काढतो, तुम्ही खिशात घेऊन घरी जावा.
त्यांनी मला ते सोने एका कागदाच्या पुडीमध्ये घालून हाके यांना खिशात ठेवण्यास सांगितले. त्याची खात्री करून खिशात ठेवल्या.
त्यानंतर एक इसम मला म्हणाला की , त्या पुडीवर नाव टाकायचे राहिले आहे , ती पुडी परत द्या , असे म्हटल्यावर ती पुडी हाके यांनी त्यांच्या हातात दिली व त्या तिघांनी मिळून पुडीची आदलाबदल करून एक पुडी हाके यांना खिशात ठेवण्यास सांगून घरी जाण्यास सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज