mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धोका टळला! मंगळवेढा तालुक्यातील ‘ही’ चार मुले रोमानियाला सुखरूप पोहचली; आज भारतात परतणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 3, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
ऑपरेशन गंगा! सोलापूर जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेनमधून परतले; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

युक्रेन मधील डेनिप्रो येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे सोलापूर जिल्ह्यातील एकोणीस विद्यार्थी तर मंगळवेढा तालुक्यातील चार विद्यार्थी तब्बल अकराशे किलोमीटर व बावीस तासाच्या बस प्रवास करून तेथील प्रमाण वेळेनुसार सकाळी सात वाजता रोमोनिया देशातील सिरेत या शहरात सुखरुप पोहचले.

अतिशय भयावह अशा युद्धजन्य वातावरणातून सुखरूप बाहेर आल्यामुळे त्यांच्यासह त्यांचे पालक व नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

सुरुवातीला डेनिप्रो शहर युद्धझळांपासून लांब होते. पण मागील दोन दिवसात रशियाची आक्रमकता वाढल्याने कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते अशी परिस्थिती होती. त्यामुळे लवकरात लवकर भारतात परतणे क्रमप्राप्त होते.

पण त्यासाठी युक्रेनच्या सीमा ओलांडून शेजारील देशात जाणे आवश्यक होते. त्यासाठी येथील विद्यार्थ्यांचा आटापिटा चालू होता. मागील पाच-सहा दिवसापासुन बससाठी प्रयत्न करूनही व्यवस्था होत नव्हती.

त्यातच बंकर मध्ये घ्यावा लागलेला आश्रय आणि सातत्याने वाजणारे सायरन यामुळे प्रचंड दडपण आणि भीतीदायक वातावरण होते. रात्रीच्या वेळी तर झोपही लागत नव्हती.

दुसरीकडे दिवसेंदिवस युध्दाचा ज्वर वाढत होता. सर्वांचे फोन आणि मेसेज चालू होते. काय बोलावे काही कळत नव्हते. शेवटी प्रयत्नानंतर काल तीन बस मिळाल्या. त्याही शेवटच्या असल्याचे कळाले.

त्यातील तिसऱ्या बसमध्ये शेवटी कशीबशी जागा मिळाली. बसचा बावीस तासांचा प्रवासही थरारक होता. कधी काय घडेल, काही सांगता येत नव्हते.

दर दहा मिनिटाला ठिकठिकाणच्या चेक पॉईंट वर बस चेक केल्या जायच्या. युक्रेनच्या सीमा ओलांडून रोमोनियात प्रवेश केला तो खरा सुटकेचा क्षण अविस्मरणीय असाच म्हणावा लागेल.

इथे आल्यानंतर आता खूप रिलॅक्स वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तेथून भारतात येण्यासाठी विमानांची व्यवस्था केली जात आहे.

यापूर्वीही तेथे आलेले अनेक भारतीयअसून सर्वांना टोकन देऊन त्यानुसार क्रमाने भारतात पाठविले जात आहे.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी येण्यास अजून दोन-तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो असे सांगितले.

रोमोनिया देशातील सिरेत या शहरात युक्रेनवरून आलेल्या 450 भारतीयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील पोलिसांकडून सर्वांची अतिशय काळजी घेतली जात असून चहा, अल्पोपहार, जेवण, राहण्याची उत्तम सुविधा या सर्व सोयी अगदी मोफत पुरविल्या जात आहेत.

याशिवाय मानसिक आधार देण्याचेही महत्वपूर्ण काम तेथील पोलीस करत आहेत. त्यामुळे गेल्या आठवडाभराच्या तंग वातावरणानंतर आता सर्वजण खूप रिलॅक्स झाले आहेत.

दादा भोसले मंगळवेढा, पालक रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून मागील सात-आठ दिवस अतिशय तणावात गेले. बातम्या पाहत असताना तर कालची रात्र काळरात्रच वाटत होती.

मुलांना युक्रेनची सीमा ओलांडण्यासाठी स्वतःबसची व्यवस्था करावी लागत होती आणि त्यासाठी बाहेर पडता येत नव्हते. काल कशीतरी बसची व्यवस्था झाली आणि अगदी अंतिम क्षणी का असेना पण मुले सुखरूप युक्रेनच्या बाहेर पडली, याचे खूप समाधान आहे.(स्रोत:सकाळ)

मंगळवेढा तालुक्यातील ‘ही’ चार मुले रोमोनियात सुखरूप पोहचली

प्रथमेश माने, रितेश गवळी, प्रथमेश कांबळे व प्राजक्ता भोसले,

सोलापूर जिल्ह्यातील रोमोनियात सुखरूप पोहचलेले विद्यार्थी

वेदांत पाटील, विश्वास बोंगे, वैष्णव कोळी, अभिजित चव्हाण, निरंजन कळभरमे, सचिन कारंडे, शिवम सावंत, आकाश पवार, प्राजक्ता घाडगे, साक्षी पाटील, संस्कृती माने, आयुशी बनसोड, श्रेयश सावळे, किंजल कांबळे, प्रबोधिनी कदम.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढायुक्रेन

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील हिंन्दू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान, गैबीपीर ऊरूसास आजपासून प्रारंभ; ‘या’ कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढ्यातील हिंन्दू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान, गैबीपीर ऊरूसास आजपासून प्रारंभ; 'या' कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..