टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. मतदान झालेल्या 16 पैकी 16 जागांवर सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
तर दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनला एकही जागा जिंकता आली नाही. दूध संघ बचाव पॅनलच्या उमेदवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची सून वैशाली साठे यांचा देखील पराभव झाला आहे.
मंगळवेढा येथील विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.
जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची झाली. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलला दूध संघ बचाव कृती समितीने आव्हान दिले होते.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली साठे या दूध संघ बचाव पॅनलच्या उमेदवार होत्या. त्यामुळे ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची झाली होती. परंतु, आज लागलेल्या निकालात दूध संघ बचाव पॅनलच्या सर्वच उमेदवारांसह वैशाली साठे यांचाही पराभव झाला.
जिल्हा दूध संघात 17 जणांचे संचालक मंडळ आहे. परंतु, ओबीसी मधून काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे दीपक माळी यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली तर उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक लागली होती. या 16 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात उतरले होते.
बाळे परिसरातील चंडक प्रशालेमध्ये शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. या वेळेत 316 मतदारांपैकी 313 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक पार पारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.
कोणाला किती मतदान झाले पहा ही आकडेवारी
दूध संघ बचाव सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
अनिल अवताडे 90
सुवर्णा इंगळे 88
कांचन घाडगे 84
भाऊसाहेब धावणे 88
पार्वतीबाई पाटील 79
संजय पोद्दार 81
सुनीता शिंदे 84
शेतकरी विकास पॅनल सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
बबनराव आवताडे 189
मनोज गरड 189
अलका चौगुले 202
बाळासाहेब माळी 227
राजेंद्र मोरे 218
संभाजी मोरे 214
विजय येलपले 211
मारुती लवटे 226
औदुंबर वाडदेकर 218
रणजितसिंह शिंदे 207
वैशाली शेंबडे 199
योगेश सोपल 201
महिला प्रतिनिधी दूध संघ बचाव उमेदवार
संगीता लोंढे 67
वैशाली साठे 144
शेतकरी विकास पॅनलचे महिला उमेदवार
निर्मला काकडे 160
छाया ढेकणे 206
भटक्या विमुक्त जाती उमेदवार
राजेंद्रसिंह पाटील 235
रमजान नदाफ 74
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी उमेदवार
मंगल केंगार(दूध संघ बचाव) 80
जयंत साळे(शेतकरी विकास) 228
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज