टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील अवैध धंद्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्यांचे धाडसत्र सुरूच असून नंदेश्वर येथील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 1 लाख 37 हजार 505 रुपयांचा ऐवज सापडला असून या कारवाईतही शिक्षक सापडल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.
दोन दिवसापूर्वी कचरेवाडी येथे टाकलेल्या धाडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सापडल्याची घटना ताजी असतानाच आता माध्यमिक शिक्षक जुगार खेळताना सापडल्यामुळे पालक वर्गातून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
नंदेश्वर येथील जय भवानी चौकात असलेल्या राजू गरंडे यांचे बंद खोलीत जुगार चालू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली.
दरम्यान, त्यांनी टाकलेल्या धाडीत राजू भगवान गरंडे (वय 30), भानुदास लक्ष्मण कसबे (वय 50), सुदर्शन नामदेव रामगडे (वय 32), महादेव सुखदेव चौगुले (वय 52), अंकुश सुखदेव चौगुले (वय 39), बाबासो श्रीरंग क्षीरसागर (वय 52), बजरंग धोंडीबा चौगुले (वय 55), संभाजी बबन खापे (वय 40) यांना ताब्यात घेवून
त्यांच्याकडे 26 हजार 500 पाच रुपये रोख व 39 हजार 500 रुपयेचे मोबाईल व 72 हजार रुपये तीन मोटारसायकली असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणाची फिर्याद प्रशांत चव्हाण यांनी दिली.
आ.समाधान आवताडे यांनी तालुक्यातील अवैध धंद्या बाबतचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता.
या अधिवेशनात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर देखील उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांचे कारवाईचे सत्र सुरू ठेवले.
या कारवाईत मुद्देमाल हि सापडू लागला.त्यामुळे अवैध धंद्यातून पैसे मिळवणे याकडे अलीकडच्या तरुणाईचे लक्ष लागले त्यामुळे त्यांना या व्यवसायातून
परावृत्त करण्यासाठी पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे करण्याबाबत देखील सूर निमित्ताने निघू लागला. अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई पर्याय होवू शकत नाही.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज