टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी परिसरात पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेत जुगार खेळताना पोलीस खात्याने टाकलेल्या धाडीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.या प्रकरणाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने यांनी दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कचरेवाडी परिसरात दिलीप मेटकरी यांच्या घरासमोर असलेल्या पाटबंधारे खात्याच्या
जागेत तीन पानी जुगार पैशावर खेळत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. असता सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. असता पाच ते सहा लोक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मध्ये दिलीप रामचंद्र मेटकरी वय 64, दत्तात्रय श्रीमंत आवळेकर वय 42 ,दत्तात्रय अंकुश माने वय 34, सिताराम मोहन फटे वय 54, सर्वजण रा. कचरेवाडी असे मिळून आले तर पळून गेलेल्यामध्ये
उमेश उत्तम गवळी रा.भालेवाडी, बबलू सिताराम शिंदे, लाला काळुंगे, महिपती अंकुश माने, पिंटू माने सर्व जण रा.कचरेवाडी त्यांच्या समोर जुगाराच्या पाने व रोख रक्कम 15 हजार 550 रुपये तसेच चार दुचाकी व तीन मोबाईल सह 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे,
पो.हे.काॅ महेश कोळी, पोलीस नाईक विठ्ठल कोळी, पो. कॉ. सोमनाथ माने, पो. कॉ.मलसिध्द कोळी, चालक समाधान यादव यांनी पार पाडली. तालुक्यातील अवैध धंद्यावर पदभार घेतल्यापासून पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी कारवाईचा धडाका लावला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज