टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटल हे तालुक्यासह इतर भागातील नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याचे गौरउद्गार आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहेत.
गजानन लोकसेवा हॉस्पिटल फॉर स्पेशलाईज्ड सर्जरी विस्तार कक्ष उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
आता गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये अर्थोपिडीक सर्जरी, स्पाइन सर्जरी, जनरल सर्जरी (पोटाच्या शस्त्रक्रिया), किडनी शस्त्रक्रिया (मुतखड्याच्या शस्त्रक्रिया), प्लास्टिक सर्जरी, सांधे बदलीच्या शस्त्रक्रिया या सर्व शस्त्रक्रिया एकाच छताखाली होत असल्याने नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होत आहे.
याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.श्रीनिवास कोरूलकर, सचिव डॉ.सुरेश होणमाने, डॉ.प्रीती शिर्के, डॉ.सुरेश काटकर, निमा अध्यक्ष डॉ.सुनील जाधव, डॉ.सुभाष देशमुख,डॉ.शाकिर सय्यद आदीजन उपस्थित होते.
आ.समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आपल्या भूमीत हॉस्पिटल उभे करून भूमीतील नागरिकांची सेवा करण्याचे काम डॉ.प्रविण सारडा हे करत आहे.
डॉक्टरकी पेशाचे एवढे मोठे शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या शिक्षणाचा व डॉक्टरकीचा फायदा आपल्या गावातील लोकांना व गरीब जनतेला कसा मिळेल याचा विचार केला आहे.
मंगळवेढा सारख्या भागात आता गुणवत्ता पुर्ण व योग्य पद्धतीचे उपचार मिळत असल्यामुळे रुग्णांना बाहेरगावी जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.सुभाष कदम उद्योजक शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, माजी नगरसेवक खंडू खंदारे, आदित्य मुदगुल, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, मुजमिल काझी, उद्योजक सतीश हजारे, शिवाजी ढगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज