टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील जित्ती येथून एका 16 वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात असून या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.24 रोजी यातील 16 वर्षीय अपहरणकर्ता मुलगा सकाळी 8.00 वा. घरातून बाहेर पडला.
सदगुरु बागडे महाराज विदयालय दरम्यान त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
त्याचे वर्णन अंगाने सडपातळ,रंग सावळा,चेहरा गोल,नाक सरळ,उंची 4 फुट 2 इंच असून त्याच्या अंगात काळा शर्ट त्यावर पांढरा पट्टा,जिन्स काळया कलरची पँट असून तो इयत्ता 10 वी वर्गात शिकत आहे.
वरील वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज