टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा उपकारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेले ९ कैदी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने नवीन तहसिल कार्यालयातील सबजेलमध्ये हलविण्यात आले आहे.
दरम्यान मंगळवेढा पोलिस दलातील ९ पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा उपकारागृहात 38 कैदी असून यापैकी 9 कैदी पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी एका कैदयाला कोविडची लक्षणे दिसून आल्याने मंगळवारी आरोग्य विभागाने सर्व कैदयांची तपासणी केली असता त्यामध्ये 8 जण कैदी पॉझिटिव्ह आले.
या कैदयांना स्वतंत्र ठेवण्यासाठी नविन तहसील कार्यालयातील उपकारागृहात स्वच्छता व सॅनिटायझर करून त्यांना तेथे ठेवण्यात आले.
कैदयांना नवीन कारागृहात नेण्यासाठी सरकारी अॅब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे पोलिस व्हॅनमधून नेण्यात आल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंगळवेढयात पोलिस ठाण्याकडील मागील 4 दिवसापुर्वी 4 पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने पोलिस दलातील कर्मचार्यांचे मंगळवारी तपासणी करण्यात आल्यावर एकूण पॉझिटिव्हची संख्या 9 झाली आहे.
यामध्ये सहाय्यक फौजदार 1, हवालदार 1, पोलिस शिपाई 1, महिला पोलिस शिपाई 1, पोलिस नाईक 4, हवालदार 1 असे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
गतवर्षी उपकारागृहातील 32 कैदी तर पोलिस दलातील 28 पोलिस कर्मचारी एकाच वेळी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धांदल उडाली होती.
मंगळवेढयात पोलिस कर्मचार्यांची संख्या कमी असताना कोरोनाचे नैसर्गिक संकट कोसळल्याने आहे त्या कर्मचार्यांवर कामाचा ताण येणार आहे.
गतवर्षी मुख्यालयाकडील पोलिस कर्मचारी बोलावून पोलिस स्टेशनचा कारभार चालविण्याची वेळ प्रशासनावर आली होती.
शासनाने पोलिस दलातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आर्थिक मदत म्हणून 50 हजार रुपये दिली जात होती.
सध्या ती बंद करण्यात आल्यामुळे कोविड कर्मचार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोविड काळात पोलिस दल हे रात्रंदिवस काम करणारे असताना शासनाने याचा विचार करून त्यांना आर्थिक मदत देणे अपेक्षीत असल्याचा बोलबाला होत आहे.
कैदयांना लागण कशी झाली याबाबत चर्चा होत असून पोलिस कर्मचारी गार्डवर डयुटी करीत असल्याने त्यांच्याशी संपर्क येवून लागण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज