टीम मंगळवेढा टाईम्स।
ओमिक्रॉन संसर्गाच्या पाश्र्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खूपच खबरदारी घेतली आहे. ज्यांच्याकडे लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आहे त्यांनाच पंपावर पेट्रोल मिळणार आहे.

त्याबाबतची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले आहेत.
शहर आणि जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही निर्बंध कडक केले आहेत.
मंगळवेढा शहरातील पेट्रोल पंपांवर दोन लस घेतलेल्यानाच पेट्रोल देण्याची सक्ती प्रशासनाने केली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी व्यवस्थापक शंभू मामा नागणे, नगरपालिकेचे कर्मचारी बाबा पवार, विठ्ठल कांबळे, हनुमंत गडेकर, राजमाने, युनूस मोगल, दत्तात्रय ढोणे, सोमनाथ ताड, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
मात्र , अनेक पंपांवर ग्राहक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील खरेदी विक्री संघाच्या पंपावर लसीकरण कॅम्प लावण्यात आला आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात १८ ते ४५ या वयोगटातील लसीकरण न झालेल्यांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे. त्या वयोगटातील लसीकरण अत्यंत गरजेचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन पोलिस बंदोबस्तासाठी राहणार आहेत.
पंपांवर लसीकरण कॅम्प
ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले नाहीत. त्यांना पेट्रोल मिळणार नाही. पण, संबंधीत ग्राहकाला त्याच पंपावर लसीकरण करुन घेता यावे यासाठी शहरातील पंपावर आजपासून लसीकरणाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











