टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका मोठ्या कन्ट्रक्शन कंपनीत काम करणारा मजुर काम करत असताना 30 फूट उंचीच्या अंतरावरून जोरात खाली पडला होता त्यास डॉ.प्रवीण सारडा यांनी गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करून कामावर पाठवले आहे.
दोन मणके, खुब्याचे हाड, कोपऱ्याचे हाड, मनगठ हाड फॅक्चर होऊन इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुखापत झालेले दानिश मोहम्मद खान यांना गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
दानिश खान यांच्यावर तातडीने दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांना चालता येऊ लागले व हाताची हालचाल होऊ लागली.
दोन यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दानिश खान हे 28 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये चालत आल्यामुळे डॉ.प्रवीण सारडा यांचे आभार मानले.
दानिश खान हे दिलीप बिल्डकोन या कंपनीत कामगार आहेत, आता ते पहिल्याप्रमाणे कामावर रुजू देखील झाले आहेत.
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज