टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात बांधकामासमोर अनधिकृत वाळू साठे केलेल्या ३७ लोकांना महसूल विभागाकडून नोटीसा बजावून सात दिवसाच्या आत याबाबत खुलासा मागविण्यात आला असून खुलासा न आल्यास कारवाईचा इशारा त्या नोटीसमध्ये देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्हयात कोठेही वाळूचा शासनाकडून जाहिर लिलाव झालेला नसतानाही शहरात बांधकामाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात रात्रीच्यावेळी वाळू येवून पडत असल्याचे चित्र होते.
परिणामी या बेकायदा वाळू उपशामुळे शासनाचा तोटा होत असल्याचे गृहित धरून महसूल विभागाचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी अनधिकृत वाळूसाठयावर कारवाईची मोहिम हाती घेतली होती.
या कारवाईत अनधिकृत वाळू साठे जप्त करून ती वाळू तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केली होती.
सदर बेकायदा वाळू साठा प्रकरणी संबंधित तलाठयाकडून दि.२१ ऑक्टोबर रोजीचा अहवाल तहसीलदार यांना प्राप्त होताच तहसीलदारांनी ३७ लोकांना कारवाईच्या नोटीसा बजावल्या असून या नोटीसांमुळे खळबळ उडाली आहे.
या नोटीसमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८ (७) अन्वये आपणावर दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये असे नमूद करण्यात आले आहे.
अदयापही वाळू चोरीचे प्रमाण बंद न होता ते रात्रीच्यावेळी सुरुच असल्याचे चित्र आहे. मागील काही महिन्यापुर्वी माण नदीपात्रातून बोटीव्दारे वाळू उपसा होत असल्याने महसूल विभाग कारवाई करून जवळपास अडीच लाखाची वाळू जप्त केली होती.
कारवाईबाबत नेमके काय झाले ते अदयापही नागरिकांना समजू न शकल्याने ते अनभिज्ञ आहेत. महसूल प्रशासनाने याबाबतची माहिती नागरिकांसाठी खुली करावी अशी मागणी होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज