mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लस न घेणाऱ्यांना रेशन नाही, शासकीय लाभ मिळणार नाही; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 18, 2021
in सोलापूर
मंगळवेढेकरांनो! तिसरी लाट येण्याअगोदर कोरोना लस घ्या; शिर्के हॉस्पिटलमध्ये मिळतेय कोविशील्ड लस

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा असर कमी होताना दिसत असला तरी लस प्रत्येकांनी घेणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्यांसाठी पाथुर्डी (ता.करमाळा) ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकून एक आगळा निर्णय घेतला आहे.

कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या संबधित परिवाराला स्वस्त धान्य दिले जाणार नाही, एवढेच नाही तर शासकीय योजनांचा कोणताही लाभ दिला जाणार नाही असा ठरावच पाथुर्डी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केला आहे.

पाथुर्डी येथील हनुमान मंदिर येथे ग्रामसभा झाली. सरपंच अश्विनी मोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली.

या वेळी उपसरपंच प्रकाश खरात, ग्रामसेवक महेश काळे, ग्रामपंचायत सदस्य रुक्‍मिणी मोटे, सचिन चांगण, चांगदेव कानडे, कृषी सहाय्यक पारेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शीतलकुमार मोटे, मुख्याध्यापक महेश कांबळे, चेअरमन संतोष मोटे, पोलिस पाटील विजय कोरे,

सदाशिव तोडेकर, रोजगार सेवक विठ्ठल मोटे, अंगणवाडी सेविका पुष्पा कोरे, माजी सरपंच बाळासाहेब मोटे, चेअरमन नाना नाळे, रामभाऊ राऊत व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

त्यामध्ये ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने गाव शंभर टक्के लसीकरणयुक्त होण्यासाठी पुढील ठराव घेण्यात आले.

ग्रामपंचायतीचा ठराव

जे ग्रामस्थ कोरोना प्रतिबंधक लस घ्यायचे राहिले आहेत त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, तहसीलदार समीर माने, करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या आदेशानुसार यापुढे रेशन धान्य मिळणार नाही.

तसेच ग्रामपंचायतकडून लागणारी शासकीय कागदपत्रेही मिळणार नाहीत. तरी कृपया आपण व आपल्या कुटुंबातील जे सदस्य लस घ्यायचे राहिलेले आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन पाथुर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.(स्रोत:सकाळ)

लस घेऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा

गावात कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत तर कोरोना काळात गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्या कुटुंबांसारखी इतर कुटुंबांची अवस्था होऊ नये यामुळे लस घेऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला आहे.- शीतलकुमार मोटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पाथुर्डी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लससोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली 'ही' घोषणा

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा