टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये 9 वर्षाच्या मुलाच्या मणक्यात (स्पाईन) घुसलेली कात्री डॉ.प्रवीण सारडा यांनी दुर्मिळ आणि गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या बाहेर काढली आहे.
या गुंतागुंतीची व दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसात त्या मुलाला डॉक्टरांनी चालत घरी पाठवले असल्याने डॉ.प्रवीण सारडा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
9 वर्षाच्या मुलाला मणक्यात कंबरेजवळ दुर्दैवी अपघाताने कात्री घुसली होती. त्याच्या पायांच्या नसांना मोठा धोका निर्माण झाला होता.
पण डॉ.प्रवीण सारडा यांच्या प्रयत्नांमुळे आता त्या मुलाला व्यवस्थित चालता येत असल्यामुळे त्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज