टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रउजनी धरणाच्या कॅनालसाठी करमाळा तालुक्यातील संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात मोहोळ तालुक्यातील मिरी येथे पुनर्वसनात मिळालेली जमीन
बोगस महिला दुय्यम निबंधक कार्यालयात उभी करून खरेदी केल्याप्रकरणी चौघा जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना २० सप्टेंबर रोजी मिरी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा येथील वसुधा सुहास जोशी यांची करमाळा येथील जमीन उजनी धरणासाठी संपादित करण्यात आली होती.
त्या मोबदल्यात मोहोळ तालुक्यातील मिरी येथील जमीन गट नंबर ११५ / २ ब ही दोन हेक्टर ८३ आर ही सात एकर जमीन मिळाली होती.
फिर्यादी या पुणे येथे स्थाईक असल्यामुळे सदरची जमीन पडीक स्वरूपात वहीवाटीत नव्हती. दरम्यान १५ सप्टेंबर २०२१ रोजी जमीन आमच्या परस्पर विकल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार १६ सप्टेंबर २०२१ रोजी मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता ,एका अनोळखी महिलेचे बनावट आधार कार्ड बनवून अनोळखी महिला उभी करुन ती जमीन त्या महिलेने मिरी येथील भाऊसाहेब अण्णा पाटील यांना २५ लाख रुपयाला विकल्याचे निदर्शनास आले.
त्या खरेदी खताला साक्षीदार म्हणुन मिरी येथील प्रभाकर गोणे व बाळकृष्ण पंढरीनाथ पाटील यांनी सह्या केल्याचे निदर्शनास आले.
यावरून माझ्या नावाची बोगस महिला उभी करून वरील तिघानी माझ्या नावाचा येथे गैरवापर करून जमीन विकल्याप्रकरणी अनोळखी स्वरूपात महिला , भाऊसाहेब पाटील , महेश प्रभाकर गोणे , रोजी व बाळकृष्ण प्रभाकर पाटील या चौघा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहेत. पुण्यात राहणाऱ्या जोशी कुटुंबाला १५ सप्टेंबर रोजी करमाळयातुन फोन आला, तुमची मिरी येथील पुनर्वसनातील जमीन तुमच्या परस्पर विकली गेली.
अचानक धक्का बसलेल्याजोशी कुटुबांने १६ सप्टेबर रोजी मोहोळ गाठले व हा प्रकार उघडकीस आला.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज