टीम मंगळवेढा टाईम्स ।
अक्षरगंध साहित्य मंच,मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि. 29 ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथे पहिले अक्षरगंध साहित्य व सांस्कृतिक राज्यस्तरीय संमेलन ऑनलाईन पध्दतीने होत आहे.
आज सकाळी साहित्य पालखीचे पूजन सकाळी 9 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते तसेच भिमराव मोरे व सरोज काझी यांच्या उपस्थितीत होत असून
संमेलनाचे उदघाटन 9.10 वाजता मंगळवेढयाचे माजी सभापती अॅड.नंदकुमार पवार यांच्या हस्ते व संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.स्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्वागताध्यक्ष अॅड.दत्तात्रय तोडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
खालील लिंक वर क्लिक करून पाहता येणार
https://youtube.com/channel/UChUjzSt1KAIxd5w61wtMN-A.
राज्यस्तरीय अक्षरगंध साहित्य संस्कृती संमेलन पाहण्यासाठी shahar entertainment(शहर एंटरटेनमेंट )या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा
सकाळी 9.45 वाजता कवी स्व.वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितेच्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन युवक नेते रोहन परिचारक यांच्या हस्ते व बबलू सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यानंतर 10.20 वाजता शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे उदघाटन सहकार भारतीचे तालुकाध्यक्ष तात्यासाहेब चव्हाण यांच्या हस्ते संगीत विशारद प्रा.कल्पेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अर्षद आतार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सकाळी 11 वाजता गझलोत्सव या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते व पुण्याचे ज्येष्ठ गझलकार प्रा.शांताराम हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
दुपारी 12.05 वाजता कथाकथन या कार्यक्रमाचे उदघाटन जयमल्हार क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष मारूती वाकडे यांच्या हस्ते व पंढरपूरचे ज्येष्ठ कथाकार प्रा.भास्कर बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र कापशीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे,
दुपारी 1.35 वाजता एकपात्री अभिनय सादरीकरण कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेवक प्रविण खवतोडे यांच्या हस्ते व ज्येष्ठ समाजसेवक शिवाजीराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून दुपारी 2.15 वाजता उपशास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे उदघाटन रतनचंद शहा बँकेचे व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप यांच्या हस्ते व संगीत विशारद राजेंद्र घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
दुपारी 3.20 वाजता कवितोत्सव या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.प्रणिता भगिरथ भालके यांच्या हस्ते जि.प.सदस्या शैला गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रफुल्लता स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
सायं 5.10 वाजता ट्रॅक शो या हिंदी मराठी गाण्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या हस्ते व उद्योजक सद्दाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून नृत्याविष्कार कार्यक्रमाचे उदघाटन सायंकाळी 6 वाजता मंगळवेढा व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष शैलेश आवताडे यांच्या हस्ते व यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन निला अटकळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
तर संमेलनाचा समारोप सायंकाळी 7 वाजता माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते होणार आहे.
सदरचे संमेलन पार पाडण्यासाठी अक्षरगंध साहित्य मंचचे संस्थापक दिगंबर भगरे,जिल्हाध्यक्ष निलकंठ कुंभार,मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रमोद बिनवडे,नृत्य परिषद मंगळवेढा तालुकाध्यक्ष लहू ढगे,मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे यांचेसह संयोजन समितीचे सदस्य राकेश गायकवाड,हरीप्रसाद देवकर,अजय देशपांडे,शुभदा जोशी,प्रा.लता माळी,अनुराधा लवटे,विदया माने,मंगल बनसोडे आदी प्रयत्नशील आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज